Join us

Jawar Bajarabhav : बुलढाणा, लातूर बाजारात ज्वारीला काय भाव मिळाला? वाचा सविस्तर बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2024 19:20 IST

Jawar Market : राज्यातील केवळ बुलढाणा, लातूर याच बाजार समितीमध्ये ज्वारीची (Sorghum) आवक झाली.

Jawar Market : आज आज रविवार असल्याने ज्वारीची (Jawar) केवळ 246 क्विंटलची आवक झाली. राज्यातील केवळ बुलढाणा (Buldhana) , लातूर याच बाजार समितीमध्ये ज्वारीची आवक झाली. यात हायब्रीड आणि पांढऱ्या ज्वारीचा समावेश दिसून आला. तर सरासरी 1800 रुपये पासून 2200 पर्यंत दर मिळाला.

लातूर जिल्ह्यातील (Latur District) औसा बाजार समितीत हायब्रीड ज्वारीची बारा क्विंटल ची आवक झाली या बाजार समितीत कमीत कमी 1750 रुपये तर सरासरी 1824 रुपयांचा दर मिळाला. तर असा बाजार समितीतच पांढऱ्या ज्वारीची 64 क्विंटलची आवक झाली. या ज्वारीला कमीत कमी 02 हजार रुपये तर सरासरी 2281 रुपये दर मिळाला.

बुलढाणा बाजार समितीत हायब्रीड ज्वारीचे 170 क्विंटलचे झाली या ज्वारीला कमीत कमी पंधराशे रुपये तर सरासरी 1850 रुपयांचा दर मिळाला. तर काल हायब्रीड ज्वारीला सरासरी 1800 रुपयांपासून ते 2900 रुपयांपर्यंत दर मिळाला होता. 

असे आहेत ज्वारी बाजारभाव

 

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

02/06/2024
बुलढाणाहायब्रीडक्विंटल170150022001850
लातूरहायब्रीडक्विंटल12175019211824
लातूरपांढरीक्विंटल64200027012281
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)246
टॅग्स :शेतीमार्केट यार्डज्वारीशेती क्षेत्र