Join us

द्राक्ष आवक घटली, टोमॅटोला काय दर मिळाला? जाणून आजचे बाजारभाव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2024 17:16 IST

आजच्या बाजारभाव अहवालानुसार द्राक्ष आणि टोमॅटोला नेमका काय भाव मिळाला हे पाहुयात...

रविवारनंतर आज अनेक बाजार समित्यांमध्ये फळांसह भाजीपाल्याची आवक पाहायला मिळाले. आजच्या बाजारभाव अहवालानुसार टोमॅटोला प्रतिक्विंटल 2200 रुपयांचा बाजारभाव मिळाला. तर द्राक्ष पिकास आज देखील शेतकऱ्यांना अपेक्षित असा बाजारभाव मिळाला नाही. आजच्या बाजारभाव अहवालानुसार नेमका काय भाव मिळाला हे पाहुयात...

टोमॅटोचे आजचे बाजारभाव 

आज 12 फेब्रुवारी 2024 रोजी राज्य शासनाच्या स्मार्ट प्रकल्पाच्या अंतर्गत बाजार माहिती विश्लेषण व जोखीम कक्षाने दिलेला आजचा अहवालानुसार कोल्हापूर     बाजार समितीत 302 क्विंटल टोमॅटोची आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी 500 रुपये तर सरासरी 1500 रुपये दर प्रति क्विंटलला मिळाला. पुणे बाजार समितीत 1301 क्विंटल टोमॅटोची आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी 1000 रुपये तर सरासरी 1750 रुपये दर प्रति क्विंटलला मिळाला. पनवेल बाजार समितीत 670 क्विंटल टोमॅटोची आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी 2500    रुपये तर सरासरी 2600 रुपये दर प्रति क्विंटलला मिळाला. मुंबई बाजार समितीत 2545 क्विंटल टोमॅटोची आवक झाली. या ठिकाणी कमीत कमी 2600 रुपये तर सरासरी 2900 रुपये दर प्रति क्विंटलला मिळाला. 

आजचे द्राक्ष बाजारभाव आज 12 फेब्रुवारी 2024 च्या राज्य शासनाच्या स्मार्ट प्रकल्पाच्या अंतर्गत बाजार माहिती विश्लेषण व जोखीम कक्षाने दिलेला आजचा अहवालानुसार पुणे बाजार समितीत 705 क्विंटल द्राक्षांची आवकझाली. या बाजार समितीत कमीत कमी 2000    तर सरासरी 7000 रुपयांचा दर मिळाला. नागपूरला 217 क्विंटल द्राक्षांची आवक झाली. या बाजार समितीत कमीत कमी 4000 रुपये तर सरासरी 5500 रुपये दर मिळाला. तर केळीचा बाजारभाव पाहिला तर पुणे बाजार समितीत 11    क्विंटल केळीची आवक झाली. या बाजार समितीत कमीत कमी 800 तर सरासरी 1000 रुपयांचा दर मिळाला. नागपूरला 32 क्विंटल द्राक्षांची आवक झाली. या बाजार समितीत कमीत कमी 450 रुपये तर सरासरी 525 रुपये दर मिळाला.

 

टॅग्स :शेतीमार्केट यार्डकांदाद्राक्षेटोमॅटो