Till Market : शेतीमालाच्या बाजारभावात सतत होणाऱ्या चढ-उतारांमुळे चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. अकोला, यवतमाळ, अमरावतीसह विदर्भातील प्रमुख बाजारांमध्ये तिळाच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळत आहे. (Till Market)
काही ठिकाणी दर प्रतिक्विंटल ९ हजारांचा टप्पा पार करताना दिसले. मागील काही आठवड्यांपासून स्थिर असलेले तिळाचे दर आता वधारताना दिसत आहेत. अकोला जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत (APMC) शनिवारी (२४ मे) तिळाला सरासरी ९,००० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.
काही उत्कृष्ट गुणवत्तेच्या तिळाला ९,४१० रुपये इतका उच्चांकी दर सुद्धा मिळाला आहे. (Till Market) साधारणतः बाजारात तिळाची आवक एक-दोन क्विंटल इतकी असते; मात्र दरवाढीमुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साह निर्माण झाला असून, यंदा ही आवक २३ क्विंटलपर्यंत पोहोचली आहे. कमीत कमी दर ८,८०० रुपये नोंदवण्यात आला. (Till Market)
तर आज (२७ मे ) रोजी बाजारात तीळाची आवक सुमारे २०० क्विंटल झाली. तर त्याला सर्वसाधारण दर हा ८ हजार ७१४ रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला.
राज्यातील इतर बाजार समितीमध्ये तिळाची आवक (Till Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर
शेतमाल : तील
दर प्रती युनिट (रु.)
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
27/05/2025 | ||||||
यवतमाळ | गज्जर | क्विंटल | 196 | 8600 | 9255 | 8927 |
अकोला | लोकल | क्विंटल | 4 | 8500 | 8500 | 8500 |
अमरावती | पांढरा | क्विंटल | 36 | 8500 | 9100 | 8800 |
(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषी व पणन महामंडळ)