Join us

Soyabean Market : मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील मार्केटमध्ये सोयाबीनला काय दर मिळतोय? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 20:11 IST

Soyabean Market : बाजारात नवीन सोयाबीनची आवक सुरू झाली आहे, परंतु सोयाबीनला भाव मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. 

Soyabean Market : सोयाबीनचे बाजारभाव अतिशय कमी आहेत. हमीभावापेक्षाही ८०० रुपये ते १००० रुपये कमी दराने सोयाबीन विकावी लागत आहे. सध्या मध्य प्रदेशातीलमहाराष्ट्रातील बाजारपेठांमध्ये देखील अशीच काहीशी परिस्थिती आहे. 

मध्य प्रदेश राज्यात लवकरच भावांतर योजना (भावांतर योजना) सुरू होणार आहे. बाजारात नवीन सोयाबीनची आवक सुरू झाली आहे, परंतु सोयाबीनला भाव मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. 

मध्य प्रदेशातील सोयाबीनच्या ताज्या किमती

  • रतलाम अलोट बाजार - ३ हजार ८०१ रुपये प्रति क्विंटल. 
  • खरगोन बारवाह बाजार - ३ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल.
  • सागर बिना बाजार - ४ हजार ५० रु[ये प्रति क्विंटल.
  • धार कुक्षी बाजार - ३ हजार ९०० रुपये प्रति क्विंटल.
  • खांडवा पंधना बाजार - ३ हजार ४०० रुपये प्रति क्विंटल.

तर महाराष्ट्रातील सरासरी किंमती पाहुयात... 

  • सोलापूर मार्केट - ३ हजार ८०० रुपये प्रति क्विंटल 
  • नागपूर मार्केट - ४ हजार ७६ रुपये प्रति क्विंटल 
  • जालना मार्केट - ३ हजार ९०० रुपये प्रति क्विंटल 
  • हिंगणघाट मार्केट - ३ हजार ६०० रुपये प्रति क्विंटल 
  • पैठण मार्केट -  ३ हजार २७५ रुपये प्रति क्विंटल 

 

आवक कशी राहिली? १७ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मध्य प्रदेशच्या बाजारपेठेत ८,८५५.५१ टन सोयाबीनची आवक झाली. महाराष्ट्राच्या बाजारपेठेत ४,७३२.४० टन सोयाबीनची आवक झाली. सोयाबीन उत्पादनात घट होण्याच्या अंदाजादरम्यान कमी किमती पुन्हा एकदा शेतकऱ्यांना निराश करत आहेत, ज्यामुळे पुढील हंगामासाठी सरकारच्या तेलबिया स्वयंपूर्णतेच्या मोहिमेला धोका निर्माण होऊ शकतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Soybean Prices Plunge in Maharashtra, Madhya Pradesh Markets

Web Summary : Soybean prices are below support levels in Maharashtra and Madhya Pradesh. Madhya Pradesh will soon start the Bhavantar Bhugtan Yojana. Farmers are worried due to low prices despite fresh arrivals. Market rates in both states range from ₹3,275 to ₹4,076 per quintal. Reduced prices threaten government oilseed self-sufficiency goals.
टॅग्स :सोयाबीनमार्केट यार्डमहाराष्ट्रमध्य प्रदेशशेती क्षेत्र