Join us
Daily Top 2Weekly Top 5

Soybean Market : सोयाबीन तेजीत; बीजवाईचे दर ७ हजार पार वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2026 18:13 IST

Soybean Market : सोयाबीनच्या दरात अचानक आलेल्या तेजीमुळे बाजार समित्यांमध्ये हालचाल वाढली आहे. बीजवाई सोयाबीनला ७ हजारांपेक्षा अधिक दर मिळत असताना शेतकरी मात्र भाव वाढले तेव्हा मालच उरला नाही अशी खंत व्यक्त करत आहेत. (Soybean Market)

अकोला : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या दरात गेल्या काही दिवसांत मोठी वाढ झाली असून त्याचा परिणाम आता बाजारातील आवकेवरही दिसून येत आहे.(Soybean Market)

दर तेजीत येताच बाजार समित्यांमध्ये सोयाबीन विक्रीसाठी शेतकरी आणि व्यापाऱ्यांची गर्दी वाढू लागली आहे. मात्र, बहुसंख्य शेतकऱ्यांनी आधीच कमी दरात माल विकून टाकल्याने सध्याच्या दरवाढीचा फायदा व्यापाऱ्यांनाच अधिक होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.(Soybean Market)

६ मे रोजी अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला प्रतिक्विंटल ६ हजार ते ६ हजार ५८५ रुपये दर मिळाला. त्या दिवशी बाजारात तब्बल २ हजार ४२१ क्विंटल सोयाबीनची आवक नोंदविण्यात आली.

कमी दरामुळे शेतकऱ्यांनी आधीच विकला माल

खरीप हंगामातील सोयाबीन बाजारात आल्यानंतर सुरुवातीला प्रतिक्विंटल केवळ ३ हजार ५०० ते ४ हजार रुपयांपर्यंत दर मिळत होता. उत्पादन खर्चाच्या तुलनेत अत्यंत कमी भाव मिळत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले होते.

साठवणुकीची सुविधा नसणे, पैशांची गरज आणि कर्जाचा ताण यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी डिसेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ दरम्यान कमी दरातच सोयाबीन विक्री केली.

बियाणे, खत आणि मजुरीच्या वाढलेल्या खर्चामुळे सोयाबीन उत्पादनाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला होता. त्यामुळे कमी भावामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.

आता दर वाढले, पण शेतकऱ्यांकडे मालच नाही

सध्या बाजारात सोयाबीनच्या दरात तेजी आली असली तरी बहुतांश शेतकऱ्यांकडे विक्रीसाठी फारसा माल शिल्लक नाही. त्यामुळे या भाववाढीचा थेट फायदा व्यापारी आणि साठवणूक करणाऱ्यांनाच अधिक होत असल्याचे बाजारातील जाणकार सांगत आहेत.

व्यापाऱ्यांनी कमी दरात खरेदी केलेले सोयाबीन आता वाढलेल्या दरात विक्रीसाठी आणल्याने बाजारात आवक वाढली आहे.

बीजवाई सोयाबीनला ७ हजारांचा टप्पा पार

साध्या सोयाबीनसोबतच बीजवाई सोयाबीनच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. मूर्तिजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत ६ मे रोजी बीजवाई सोयाबीनला तब्बल ७ हजार १२५ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला.

या दरामुळे बाजारात चांगल्या प्रतीच्या सोयाबीनला अधिक मागणी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सहा दिवसांत दरात मोठी वाढ

गेल्या काही दिवसांत सोयाबीनच्या बाजारभावात सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. बाजार समित्यांमधील आवक आणि मागणी यावर दर अवलंबून असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

अशी आहे सोयाबीनची सहा दिवसांची आवक, दर

तारीखसोयाबीन दर (रु./क्विंटल)आवक (क्विंटल)
२२ एप्रिल५८००१६०६
३० एप्रिल६००३१७०९
२ मे६३४५१०७०
४ मे६४९३१९९९
५ मे६५२०२१८५
६ मे६५८५२४२१

पुढील काळात दर कसे राहणार?

बाजार तज्ज्ञांच्या मते, सध्या देशांतर्गत मागणी वाढत असून तेलबिया बाजारातील हालचालींचा परिणाम सोयाबीनच्या दरावर होत आहे. तसेच शेतकऱ्यांकडे माल कमी असल्याने बाजारात उपलब्ध साठ्यावरच व्यवहार सुरू आहेत.

येत्या काही दिवसांत आवक आणि जागतिक बाजारातील परिस्थितीनुसार दरात आणखी चढ-उतार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र सध्याच्या दरवाढीमुळे शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा चांगल्या भावाची अपेक्षा निर्माण झाली आहे.

हे ही वाचा सविस्तर : Soybean Market Update : दर वाढले पण माल संपला; सोयाबीन बाजारात नेमकं काय घडलं?

अधिक वाचा : Soybean Market : सोयाबीन दर अचानक वाढले; कारण काय? वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Soybean Prices Surge; Farmer Stocks Dwindle, Traders Benefit: Details Here

Web Summary : Soybean prices are rising in Akola, exceeding ₹7,000/quintal for seed-quality beans. While prices surge, most farmers already sold their stock at lower rates due to financial constraints. Traders are now profiting from the increased market value, as farmer’s stocks are depleted.
टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती