Soybean Market : राज्यातील महत्त्वाच्या कृषी बाजारपेठांपैकी एक असलेल्या लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीत (APMC) मागील तीन महिन्यांत सोयाबीन दरात मोठी चढ-उताराची स्थिती पाहायला मिळाली.(Soybean Market)
हंगामाच्या सुरुवातीला दबावाखाली असलेले दर आता हळूहळू सावरत एप्रिलमध्ये सहा हजार रुपयांच्या पुढे गेले असून शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये नव्याने आशावाद निर्माण झाला आहे.(Soybean Market)
दरांचा प्रवास: कमीपासून उच्चांकापर्यंत
डिसेंबर-जानेवारी दरम्यान बाजारात सोयाबीनची मोठ्या प्रमाणावर आवक झाल्यामुळे दर प्रतिक्विंटल ५,२०० ते ५,५०० रुपयांच्यादरम्यान घसरले होते. अनेक शेतकऱ्यांनी तातडीच्या आर्थिक गरजेमुळे कमी दरात विक्री केली.
फेब्रुवारीपासून मात्र चित्र बदलू लागले. आवकेत किंचित घट आणि तेलबियांच्या मागणीत वाढ यामुळे दरात सुधारणा होऊ लागली.
मार्च: ५,७०० ते ५,९०० रु.
एप्रिल: सरासरी ६,००० रु., कमाल ६,१५० ते ६,२०० रु.
आवक स्थिर, मागणीमुळे दराला आधार
गेल्या आठवड्यात आवकेत मोठा बदल झाला नाही.
शुक्रवारी: ६,२८५ क्विंटल
शनिवारी: ६,२३० क्विंटल
आवक जवळपास स्थिर असतानाही तेल गिरण्या व प्रक्रिया उद्योगांकडून वाढलेली मागणी दराला आधार देत आहे.
शेतकऱ्यांना दिलासा, साठवणूक करणाऱ्यांना फायदा
दरवाढीमुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेषतः ज्या शेतकऱ्यांनी माल साठवून ठेवला होता, त्यांना सध्याच्या वाढीव दराचा थेट फायदा होत आहे.
वाढलेल्या उत्पादन खर्चाच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ आर्थिक समतोल राखण्यासाठी मदत करत आहे.
व्यापाऱ्यांची खरेदी वाढली
व्यापाऱ्यांसाठीही सध्याची परिस्थिती सकारात्मक ठरत आहे. भविष्यात दर आणखी वाढतील या अपेक्षेने खरेदीत वाढ झाली आहे. तेल गिरण्या आणि प्रक्रिया उद्योगांकडून सातत्याने मागणी येत असल्याने बाजारात चैतन्य कायम आहे.
काही शेतकऱ्यांना फटका
दरातील चढ-उतारामुळे काही शेतकरी हवालदिल झाले होते. गरजेपोटी अनेकांनी सोयाबीन ३,००० ते ४,००० रुपये प्रतिक्विंटल दरात विक्री केली. मात्र साठवणूक करणाऱ्यांना आता वाढीव दराचा फायदा मिळत आहे.
पुढील काळात काय?
तज्ज्ञांच्या मते,
आवक कमी होत राहिली आणि मागणी कायम राहिल.
तर येत्या काही आठवड्यांत सोयाबीन दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी सध्या विक्रीबाबत सावध भूमिका घेत असून योग्य दराची प्रतीक्षा करत आहेत.
मागील तीन महिन्यांच्या चढ-उतारानंतर सध्या सोयाबीन बाजार स्थिरतेकडे वाटचाल करत आहे. ६,००० रुपयांचा टप्पा पार झाल्याने शेतकरी आणि व्यापारी दोघांसाठीही सकारात्मक संकेत मिळत आहेत. आगामी काळात मागणी-पुरवठ्याच्या समीकरणावरच दरांचा पुढील कल अवलंबून राहणार आहे.
हे ही वाचा सविस्तर : harbhara kharedi : मुदतीपूर्वीच हरभरा खरेदी बंद; काय आहे कारण वाचा सविस्तर
अधिक वाचा : Shenkhat Price : शेतीत बदलता ट्रेंड; शेणखताचे दर ऐकून थक्क व्हाल!
Web Summary : Soybean prices in Latur APMC have crossed ₹6000 after fluctuating for months. Increased demand and reduced supply are supporting the price rise, benefiting farmers who stored their produce. Traders anticipate further increases, but the future depends on supply and demand.
Web Summary : लातूर एपीएमसी में सोयाबीन की कीमतें महीनों तक उतार-चढ़ाव के बाद ₹6000 को पार कर गई हैं। बढ़ी हुई मांग और कम आपूर्ति से कीमतों में वृद्धि हो रही है, जिससे उन किसानों को लाभ हो रहा है जिन्होंने अपनी उपज का भंडारण किया है। व्यापारियों को आगे और वृद्धि की उम्मीद है, लेकिन भविष्य आपूर्ति और मांग पर निर्भर करता है।