Join us
Daily Top 2Weekly Top 5

Soybean Bajar Bhav : सोयाबीनला विक्रमी तेजी; अनेक बाजारात ७ हजार पार भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 18:09 IST

Soybean Bajar Bhav : राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrivals) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

Soybean Bajar Bhav : सोयाबीनबाजारात आज (१५ मे) रोजी तेजीचे वातावरण कायम राहिल्याचे दिसून आले.(Soybean Arrivals)

राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची एकूण आवक १५,९७२ क्विंटल नोंदवण्यात आली.(Soybean Arrivals)

अनेक बाजारांमध्ये पिवळ्या सोयाबीनला मोठी मागणी दिसून आली, तर काही ठिकाणी उच्च प्रतीच्या मालाला ७ हजार रुपयांपेक्षा अधिक दर मिळाले.(Soybean Arrivals)

लातूरमध्ये उच्चांकी दर

लातूर बाजार समितीत पिवळ्या सोयाबीनला सर्वाधिक ७,८११ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. येथे ४,८२४ क्विंटलची सर्वाधिक आवक झाली असून सरासरी दर ७,४०० रुपये राहिला.

अकोला, मेहकर आणि जालन्यातही तेजी

अकोला येथे पिवळ्या सोयाबीनला कमाल ७,६०० रुपये दर मिळाला. १,९२० क्विंटल आवकीसह सरासरी दर ७,४९० रुपये राहिला.

मेहकर बाजारात ८०० क्विंटल आवक झाली असून कमाल दर ७,४०० रुपये मिळाला.

जालना येथेही ७,५०० रुपयांपर्यंत भाव मिळाल्याने बाजारात तेजीचे चित्र राहिले.

कारंजा बाजारात मोठी आवक

कारंजा बाजार समितीत २,००० क्विंटलची मोठी आवक झाली. येथे सोयाबीनला ६,७१० ते ७,२५० रुपये दर मिळाला. सरासरी दर ७,१०० रुपये राहिल्याने व्यापाऱ्यांकडून चांगली खरेदी झाल्याचे दिसून आले.

कोणत्या जातीला सर्वाधिक मागणी?

राज्यात पिवळ्या सोयाबीनला सर्वाधिक मागणी असल्याचे चित्र दिसले. लातूर, अकोला, जालना, औराद शहाजानी, सेनगाव, पालम या बाजारांमध्ये पिवळ्या जातीच्या सोयाबीनला ७ हजार रुपयांच्या पुढे भाव मिळाला.

लोकल जातीच्या सोयाबीनलाही काही बाजारात चांगला प्रतिसाद मिळाला.

सोलापूर येथे लोकल सोयाबीनला ७,३४५ रुपये कमाल दर मिळाला, तर हिंगोलीमध्ये ७,२८५ रुपये भाव मिळाला.

राज्यातील इतर बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrivals) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर

शेतमाल :सोयाबिन

दर प्रती युनिट (रु.)

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत जास्त दरसर्वसाधारण दर
15/05/2026
माजलगाव---क्विंटल115500073607151
चंद्रपूर---क्विंटल20699069906990
कारंजा---क्विंटल2000671072507100
तुळजापूर---क्विंटल115700070007000
धुळेहायब्रीडक्विंटल10595059505950
सोलापूरलोकलक्विंटल74700073457100
अमरावतीलोकलक्विंटल1698640071006750
हिंगोलीलोकलक्विंटल510670072856992
मेहकरलोकलक्विंटल800680074007250
लासलगाव - निफाडपांढराक्विंटल86500073037270
नागपूरपांढराक्विंटल225650074007175
लातूरपिवळाक्विंटल4824600078117400
जालनापिवळाक्विंटल431570075006800
अकोलापिवळाक्विंटल1920600076007490
यवतमाळपिवळाक्विंटल277726572657265
आर्वीपिवळाक्विंटल100550067206000
पैठणपिवळाक्विंटल9650065006500
वर्धापिवळाक्विंटल11677570006850
भोकरपिवळाक्विंटल7600566716005
हिंगोली- खानेगाव नाकापिवळाक्विंटल87660068006700
जिंतूरपिवळाक्विंटल1590159015901
मुर्तीजापूरपिवळाक्विंटल500640071856795
मलकापूरपिवळाक्विंटल201660073007150
सावनेरपिवळाक्विंटल25687070406975
गेवराईपिवळाक्विंटल12640070516725
आंबेजोबाईपिवळाक्विंटल183675070006750
मंठापिवळाक्विंटल53600065506500
अहमहपूरपिवळाक्विंटल561532872216274
औराद शहाजानीपिवळाक्विंटल385700072707135
मुरुमपिवळाक्विंटल13657167006636
सेनगावपिवळाक्विंटल61690073007100
पालमपिवळाक्विंटल195710071007100
मंगळूरपीर - शेलूबाजारपिवळाक्विंटल359539072307175
चांदूर-रल्वे.पिवळाक्विंटल132590073007000
उमरखेड-डांकीपिवळाक्विंटल50650067006600
राजूरापिवळाक्विंटल30685568556855
काटोलपिवळाक्विंटल86535071596550
आष्टी (वर्धा)पिवळाक्विंटल15600068106400
पुलगावपिवळाक्विंटल30686568656865
सिंदी(सेलू)पिवळाक्विंटल450535067156420

(सौजन्य : महाराष्ट्र राज्य कृषि व पणन महामंडळ)

हे ही वाचा सविस्तर : Soybean Market : १३ दिवसांत बाजार बदलला; बिजवाई सोयाबीन दराने गाठला उच्चांक

अधिक वाचा : Seed Germination Test : चमकदार बियाण्यांना फसू नका; पेरणीपूर्वी 'ही' टेस्ट कराच

टॅग्स :शेती क्षेत्रसोयाबीनबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती