Join us

Soyabean Market : सोयाबीनला हमीभाव नाहीच, आज कुठे-काय बाजारभाव मिळाला? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 20:32 IST

Soyabean Market : सोयाबीनला अद्यापही अपेक्षित बाजारभाव (Soyabean Market) मिळत नसल्याचे चित्र आहे, त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.

Soyabean Market : सोयाबीनला अद्यापही अपेक्षित बाजारभाव (Soyabean Market) मिळत नसल्याचे चित्र आहे, त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. आज दिवसभरात सोयाबीनची 52 हजार 959 क्विंटलची आवक झाली. यात वाशिम आणि अमरावती बाजारात सर्वाधिक सोयाबीनची आवक झाली. 

आज पिवळ्या सोयाबीनला (Yellow Soyabean) कमीत कमी 03 हजार 700 रुपयांपासून ते 04 हजार 450 रुपयांपर्यंत दर मिळाला. दुसरीकडे लोकल सोयाबीनला कमीत कमी 04 हजार रुपयांपासून 04 हजार 200 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला. तर लासलगाव निफाड बाजारात पांढऱ्या सोयाबीनला 04 हजार 300 रुपये  दर मिळाला.

आज पिवळ्या सोयाबीनला अकोला बाजारात (Akola Soyabean Market) 4125 रुपये, चिखली बाजारात चार हजार 220 रुपये, वाशिम बाजारात 4 हजार 450 रुपये, वर्धा बाजारात 04 हजार 100 रुपये, मलकापूर बाजारात 3750 रुपये, चांदूर बाजार बाजारात 3930 रुपये, तर काटोल बाजारात 04 हजार 50 रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

30/12/2024
अहमदनगर---क्विंटल33405041554100
अहमदनगरपिवळाक्विंटल414250041003300
अकोलापिवळाक्विंटल5322356043003978
अमरावती---क्विंटल200340041503775
अमरावतीलोकलक्विंटल9081395040994074
अमरावतीपिवळाक्विंटल4879345050484795
बुलढाणालोकलक्विंटल1500350043004000
बुलढाणापिवळाक्विंटल4935343343984088
चंद्रपुर---क्विंटल91385041604030
चंद्रपुरपिवळाक्विंटल63334035183500
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल81394541754060
हिंगोलीपिवळाक्विंटल496375041904020
जळगाव---क्विंटल650350041803800
जळगावलोकलक्विंटल86405041394139
जळगावपिवळाक्विंटल30360039903922
जालनापिवळाक्विंटल43408242224190
नागपूरलोकलक्विंटल915380042404130
नागपूरपिवळाक्विंटल360322541153875
नांदेड---क्विंटल22409042004145
नांदेडपिवळाक्विंटल18430043754300
नंदुरबार---क्विंटल10400042714200
नाशिक---क्विंटल1270275142894195
नाशिकपिवळाक्विंटल43427543004281
नाशिकपांढराक्विंटल380380043304300
पुणेनं. २क्विंटल52410042504250
वर्धापिवळाक्विंटल7026337642443978
वाशिम---क्विंटल2990378842654025
वाशिमपिवळाक्विंटल10062373847874386
यवतमाळपिवळाक्विंटल1907413043004208
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)52959
टॅग्स :सोयाबीनकृषी योजनामार्केट यार्डशेती