Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनच्या सरासरी दरात तब्बल 35.56 टक्क्यांची वाढ, क्विंटलला काय दर मिळतोय? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 12:40 IST

Soyabean Market : सोयाबीनच्या बदलत्या दरातील डिसेंबर ते जानेवारी हा प्रवास महत्त्वाचा ठरला आहे. 

नाशिक : येवला येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या बाजार भावाने दोन महिन्यांत मोठी भरारी घेतली असून, १ डिसेंबर २०२५ च्या तुलनेत २९ जानेवारी २०२६ पर्यंत सोयाबीनच्या सरासरी दरात तब्बल ३५.५६ टक्क्यांची वाढ झाली आहे. 

गेल्या कित्येक दिवसांपासून कमी दराने सोयाबीन विकावे लागत असल्याने चिंताग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांमध्ये काही प्रमाणात आनंदाचे वातावरण आहे. महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाने सोयाबीनसाठी प्रतिक्विंटल ७,०७७रुपये दराची शिफारस केली आहे. मात्र, सोयाबीनच्या बदलत्या दरातील डिसेंबर ते जानेवारी हा प्रवास महत्त्वाचा ठरला आहे. 

बाजार समितीतील सोयाबीनच्या दराची तुलना केली असता, सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येते.डिसेंबरच्या सुरुवातीला ४,३०० रुपये असलेला सरासरी दर आता ५ हजार ८२९ रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच अवघ्या ६० दिवसांत प्रतिक्विंटल १५२९ रुपयांची वाढ झाली आहे. 

२९ जानेवारी रोजी सोयाबीनला ५ हजार ८५१ रुपये इतका उच्चांकी कमाल दर मिळाला. डिसेंबरमध्ये सोयाबीनचे दर स्थिर होते. मात्र, जानेवारी महिन्यात जागतिक बाजारातील हालचाली आणि स्थानिक मागणी वाढल्यामुळे दरात मोठी सुधारणा झाली आहे. 

...असा होता सोयाबीनचा दर (प्रति क्विंटलप्रमाणे)

  • १ डिसेंबर २०२५ - किमान दर ४ हजार, कमाल दर ४ हजार ४४१ रुपये, सरासरी दर ४ हजार ३०० रुपये 
  • ०१ जानेवारी २०२६ - किमान दर १५०० रुपये, कमाल दर ४ हजार ७०० रुपये, सरासरी दर ४ हजार ६०० रुपये
  • २४ जानेवारी २०२६ - किमान दर ३ हजार ९०० रुपये, कमाल दर ५ हजार ४४६ रुपये, सरासरी दर ५ हजार ३७५ रुपये 
  • २९ जानेवारी २०२६ - किमान दर ५ हजार ७०० रुपये, कमाल दर ५ हजार ८५१ रुपये, सरासरी दर ५ हजार ८२९ रुपये 
English
हिंदी सारांश
Web Title : Soybean Prices Surge: Yeola Sees 35.56% Increase in Two Months

Web Summary : Yeola's soybean market witnessed a significant surge, with prices rising 35.56% in two months. The average rate reached ₹5,829 per quintal on January 29th, a ₹1529 increase. Increased global activity and local demand drove the price hike, bringing relief to farmers.
टॅग्स :सोयाबीनशेती क्षेत्रमार्केट यार्डशेतकरी