Smart Project : शेतमालाच्या योग्य दरासाठी आता शेतकऱ्यांना दलालांचा मुहूर्त शोधावा लागत नाही. राज्य शासनाच्या स्मार्ट प्रकल्पामुळे (Smart Project) बाजारभावांची माहिती थेट सोशल मीडियावर मिळत असल्यामुळे शेतकरी स्वतः निर्णय घेऊन अधिक दर देणाऱ्या बाजार समित्यांकडे वळले आहेत. (Smart Project)
डिजिटल युगातला हा स्मार्ट बदल शेतकऱ्यांच्या आत्मनिर्भरतेचा नवा टप्पा ठरतो आहे.(Smart Project)
राज्यातील शेतकऱ्यांना आता आपल्या शेतमालाचे बाजार भाव जाणून घेण्यासाठी दलालांवर अवलंबून राहावे लागत नाही. (Smart Project)
राज्य शासनाच्या बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पाच्या (Smart Project) अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या बाजार माहिती विश्लेषण व जोखीम निवारण कक्ष या उपक्रमामुळे शेतमालाचे दर सोशल मीडियावर थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत आहेत. त्यामुळे कृषी व्यवस्थेत सकारात्मक बदल घडत आहेत आणि शेतकरी अधिक सक्षम होत आहेत.(Smart Project)
शेतकऱ्यांसाठी नवी दिशा
कृषी विभागाचा हा 'स्मार्ट' दृष्टिकोन केवळ माहितीपुरता न राहता शेतकऱ्यांच्या आर्थिक निर्णयक्षमतेलाही नवी दिशा देतो आहे. वेळेत मिळणारी दरमाहिती, अचूक किंमत अंदाज आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर यामुळे शेतकऱ्यांना आपल्या मालासाठी चांगल्या दराचा शोध घेता येतो आहे.
जुलै महिन्यात निवडक पिकांचे संभाव्य दर (प्रति क्विंटल)
पीक | दर (रु.) |
---|---|
मका | २,००० ते २,४०० |
हरभरा | ५ ,०५० ते ५,७५० |
तूर | ६,३०० ते ६,८५० |
सोयाबीन | ४,२०० ते ४,५१५ |
कापूस | ७,४०० ते ८,००० |
दलालांवरील अवलंबित्व कमी
या उपक्रमामुळे शेतकऱ्यांनी बाजारभाव तपासून माल जास्त दर देणाऱ्या बाजार समित्यांमध्ये नेऊन विक्री करण्यास सुरुवात केली आहे. काही शेतकरी शेजारील जिल्ह्यांमध्ये जाऊनही विक्री करत आहेत. परिणामी दलालांच्या माध्यमातून होणारी फसवणूक किंवा कमी दर मिळण्याच्या समस्या कमी झाल्या आहेत.
व्हॉट्स अॅपवर थेट दरमाहिती
शेतकऱ्यांना बाजार समित्यांचे दर दररोज मिळावेत यासाठी कृषी विभागाने व्हॉट्स ॲप चॅनल सुरू केला आहे. त्याद्वारे शेतकऱ्यांना दरमाहिती थेट मोबाईलवर मिळते. हा उपक्रम सहज, सोपा व विनामूल्य आहे.
बाजारभाव अपडेट्स
अनेक शेतकऱ्यांनी या उपक्रमामुळे आपल्याला अधिक दर मिळत असून दलालांवरच्या अवलंबित्वातून मुक्तता झाल्याचे सांगितले आहे. माल कुठल्या बाजारात नेला, किती भाव मिळेल, हे ठरवणं आता सोपं झालंय, असे शेतकरी सांगतात.
कृषी विभागाच्या या स्मार्ट प्रकल्पामुळे राज्यातील बाजारव्यवस्थेत पारदर्शकता वाढली आहे आणि शेतकऱ्यांच्या हाती निर्णयशक्ती आली आहे. अधिक दर मिळवण्यासाठी आणि माहिती मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी व्हॉट्सॲप चॅनलला जोडावं, असा संदेश कृषी विभागाने दिला आहे.