Join us
Daily Top 2Weekly Top 5

Shevga Market : शेवगा शेअर बाजारासारखा कोसळला; आवक वाढली, बाजारात नेमके काय घडले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 09:26 IST

Shevga Market : शेवग्याच्या दरात मोठी घसरण झाली असून दोन महिन्यांपूर्वी १५० ते २०० रुपये किलो असलेला शेवगा आता केवळ ६० ते ८० रुपयांवर आला आहे. बाजारात आवक वाढल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला असला, तरी उत्पादन घट आणि कमी भावामुळे शेतकऱ्यांवर दुहेरी आर्थिक संकट ओढवले आहे. (Shevga Market)

अमरावती : दोन महिन्यांपूर्वी १५० ते २०० रुपये किलो दराने विकला जाणारा शेवगा सध्या केवळ ६० ते ८० रुपये किलोवर आला आहे. (Shevga Market)

उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच बाजारात शेवग्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढल्याने दरात मोठी घसरण झाली आहे. परिणामी गृहिणींना दिलासा मिळाला असला, तरी शेतकऱ्यांना मात्र दुहेरी फटका बसत आहे.(Shevga Market)

यंदा शेवगा पिकाला प्रतिकूल हवामानाचा मोठा फटका बसला. फुलोऱ्याच्या अवस्थेत पाऊस, ढगाळ वातावरण आणि धुके यामुळे मोठ्या प्रमाणावर फूलगळ झाली. त्यामुळे उत्पादन घटले. (Shevga Market)

साधारणपणे ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत उत्पादन कमी आणि मागणी जास्त असल्याने दर १५० ते २०० रुपयांपर्यंत जातात. यंदाही हिवाळ्यात असेच चित्र पाहायला मिळाले.(Shevga Market)

मात्र मार्चअखेरीस परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. नवीन हंगामातील शेवग्याचे उत्पादन बाजारात येऊ लागल्याने आवक झपाट्याने वाढली आणि दर थेट ६० ते ८० रुपयांपर्यंत कोसळले. सध्या किरकोळ बाजारातही शेवगा सुमारे ६० रुपये किलो दराने उपलब्ध आहे.

एकीकडे उत्पादन घटलेले असताना दुसरीकडे बाजारात आवक वाढल्याने भाव घसरले या दुहेरी फटक्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. मजुरी, वाहतूक आणि इतर खर्चही निघत नसल्याची स्थिती आहे.

भाजीपाला बाजारात इतरही बदल दिसत आहेत. गवारच्या दरातही मोठी घसरण झाली असून, पूर्वी १०० ते १२० रुपये किलोने विकली जाणारी गवार आता सुमारे ४० रुपयांनी स्वस्त झाली आहे.

शेवगा खाण्याचे फायदे

उन्हाळ्यात शेवगा खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. तो शरीरातील उष्णता कमी करून नैसर्गिक कूलरचे काम करतो.

शेवग्यात लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे थकवा, डिहायड्रेशन, पचनाच्या समस्या कमी होतात आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते.

पुढील काळात दर वाढणार?

खराब हवामानामुळे यंदा शेवग्याचे नुकसान झाले असले, तरी पुढील काही दिवसांत आवक कमी झाल्यास दरात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.- सतीश गुल्हाणे, भाजी विक्रेते

सध्या शेवग्याच्या दरातील घसरण ही ग्राहकांसाठी दिलासादायक असली, तरी शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब ठरत आहे.

हे ही वाचा सविस्तर : Edible Oil Market : शेंगदाणा-सोयाबीन तेल अचानक महाग? बाजारात नेमकं काय चाललंय

अधिक वाचा : Ranbhaji : तुम्ही खाताय का रानभाज्या? 'या' रोगांवर रामबाण उपाय असलेलं सुपरफूड!

English
हिंदी सारांश
Web Title : Drumstick Prices Crash: Increased Supply Plummets Market Rates

Web Summary : Drumstick prices drastically fell from ₹200 to ₹60 per kg due to increased supply. Farmers face losses from reduced yields and lower prices. Consumers benefit from the price drop, while vegetable vendors anticipate a potential price rebound soon.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीभाज्या