Shenkhat Price : उन्हाळ्याची चाहूल लागल्यानंतर रब्बी हंगाम संपताच ग्रामीण भागात शेतकऱ्यांची खरीपपूर्व तयारी जोरात सुरू झाली आहे.(Shenkhat Price)
काढणीची कामे पूर्ण झालेल्या शेतांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर शेणखत टाकण्याची लगबग दिसून येत आहे.(Shenkhat Price)
जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी आणि आगामी खरीप हंगामात चांगले उत्पादन मिळवण्यासाठी शेतकरी नैसर्गिक खतांवर भर देताना दिसत आहेत.(Shenkhat Price)
सुपिकतेसाठी शेणखताला प्राधान्य
शेणखतामुळे मातीचा पोत सुधारतो, सूक्ष्म अन्नद्रव्यांची पूर्तता होते आणि जमिनीची पाणीधारण क्षमता वाढते. त्यामुळे रासायनिक खतांच्या तुलनेत शेणखत अधिक उपयुक्त असल्याचे शेतकरी मानतात. याच कारणामुळे अनेक शेतकरी वर्षभर साठवलेले शेणखत ट्रॅक्टरद्वारे शेतात नेऊन पसरवत आहेत.
ट्रॉलीचा दर पाच हजारांवर
पूर्वी गावागावात पशुधन मुबलक असल्यामुळे शेणखत सहज उपलब्ध होत होते. मात्र, सध्या पशुधनाची संख्या घटल्याने शेणखत मिळवणे कठीण झाले आहे.
परिणामी त्याच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. सध्या एका ट्रॅक्टर ट्रॉली शेणखतासाठी सुमारे ५ हजार रुपये किंवा त्याहून अधिक दर मोजावा लागत आहे. त्यामुळे काही शेतकरी इतर गावांतून शेणखत खरेदी करत आहेत.
शेणखताला 'सोन्याचे दिवस'
शेतीतील बदलत्या पद्धती, सेंद्रिय शेतीकडे वाढता कल आणि पशुधनातील घट यामुळे शेणखताची मागणी झपाट्याने वाढली आहे. परिणामी, शेणखताला सध्या सोन्याचे दिवस आल्याचे चित्र आहे.
पशुपालकांना अतिरिक्त उत्पन्न
माझ्याकडे १५ ते २० गायी-बैल आहेत. वर्षभर त्यांच्या पालनातून मिळणारे शेणखत उन्हाळ्यात विकतो. सध्या एका ट्रॉलीला पाच हजारांपेक्षा अधिक दर मिळत आहे.- भीमराव खडसे, शेतकरी
खरीपपूर्व तयारीला वेग
शेणखत टाकण्यामुळे जमिनीची ताकद वाढून खरीप हंगामातील पिकांना चांगला पाया मिळतो. त्यामुळे शेतकरी मोठ्या उत्साहात शेतांची पूर्वतयारी करताना दिसत आहेत.
ग्रामीण भागात सर्वत्र सुरू असलेली ही लगबग आगामी हंगामासाठी शेतकऱ्यांची सकारात्मक तयारी दर्शवते.
सेंद्रिय शेतीकडे वाढता कल आणि जमिनीची सुपीकता जपण्याची जाणीव यामुळे शेणखताला पुन्हा महत्त्व प्राप्त झाले आहे. खर्च वाढला असला तरी दीर्घकालीन फायद्याच्या दृष्टीने शेतकरी शेणखताचा वापर प्राधान्याने करत असल्याचे स्पष्ट होत आहे.
हे ही वाचा सविस्तर : Organic Farming : उत्पादन वाढीचा फॉर्म्युला सापडला? शेतकरी शेणखतावर भर देतायत
Web Summary : Demand for cow dung fertilizer surges as farmers prioritize soil fertility for the upcoming Kharif season. Decreasing livestock and a focus on organic farming drive prices up to ₹5,000 per trolley, highlighting its renewed importance in agriculture.
Web Summary : आगामी खरीफ सीजन के लिए किसान मिट्टी की उर्वरता को प्राथमिकता दे रहे हैं जिससे गोबर खाद की मांग बढ़ गई है। पशुधन में कमी और जैविक खेती पर ध्यान केंद्रित करने से कीमतें ₹5,000 प्रति ट्रॉली तक बढ़ गई हैं, जो कृषि में इसके नए महत्व को उजागर करती हैं।