Kanda Shevaga Market : गेल्या काही दिवसांत भाजीपाल्याचे दर (Vegetable Market) सातत्याने घसरत आहेत. मनमाड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत टमाट्यासह सर्वच भाजीपाल्याच्या दरात घसरण झाल्याचे दिसून येत आहे. कवडीमोल दराने भाज्या विकाव्या लागत असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. कांद्यासह टोमॅटो, मटार, कोबी, फ्लॉवर सध्या काय मिळतोय? हे जाणून घेऊयात....
मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत (Manmad Market Yard) टमाट्याचे २० किलोचे क्रेट १०० रुपयांच्या आसपास उपलब्ध होत आहे. किरकोळ बाजारात टमाटे १० रुपये किलोने विक्री केले जात आहेत. याआधी टमाट्याचा किरकोळ बाजारातील दर २० रुपये प्रतिकिलो असा होता. मटार देखील घाऊक बाजारात ३० रुपये प्रति किलोने मिळत आहे.
कांद्याला प्रति क्विंटलला काय भाव?गेल्या काही दिवसांपूर्वी कांद्याच्या दरात झालेली घसरण नाहीशी होऊन कांद्याच्या दरात सुधारणा होताना दिसून येत आहे. मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीत उच्च दर्जाचा कांदा कमीत कमी २२०० रूपये क्विंटल तर जास्तीत जास्त २६७५ रुपये प्रतिक्विंटल दराने विकला गेला. मनमाड मार्केटमध्ये ७८२ नग कांद्याची आवक झाली. उच्च ३ दर्जाच्या कांद्याचा दर कमीत कमी भाव २००० रुपये प्रतिक्विंटल तर जास्तीत जास्त २४०० रुपये प्रतिक्विंटल होता.
कोबी गड्डा १० रुपयांना एक, अगोदर होता २० रुपये दर किरकोळ विक्री ४० रुपये प्रति किलो आहे. याआधी ५० ते ६० रुपये प्रति • किलो भावाने मटार मिळत होती. कोबी गड्याची पिशवी ५० रुपयात उपलब्ध आहे. या पिशवीत १५ गड्ढे येतात. किरकोळ बाजारात १० रुपयाला एक या दराने कोबीचा गड्डा विकला जात आहे. या आधी २० रुपयांच्या आसपास कोबी गड्डा विकला जात होता.
फ्लॉवरची १५ नगाची पिशवी १०० रुपयास उपलब्ध आहे. भरताची वांगी देखील घाऊक बाजारात १५ किलोला २०० रुपयांनी मिळत २ असून, घाऊक बाजारात ३० रुपये प्रति किलो दराने विकली जात आहेत. वांगी किरकोळ बाजारात २५ रुपये प्रति किलो दराने विकली जात आहेत.
शेवगा ६० रुपये किलो दोन महिन्यांपूर्वी प्रचंड भाव खाऊन गेलेला शेवगा घाऊक बाजारात ४० रुपये प्रति किलो दराने उपलब्ध आहे. किरकोळ बाजारात तो ६० रुपये प्रति किलोने विकला जात आहे. दिवाळीच्या आसपास शेवगा २५० ते ३०० रुपये प्रति किलो दराने मिळत होता. कोथिंबीर ५ रुपयाला जुडी या दराने घाऊक बाजारपेठेत मुबलक प्रमाणात आहे. तिची विक्री ८ ते १० रुपयात एक जुडी या दराने होत आहे. हिरवी मिरची देखील ३० ते ४० रुपये प्रति किलो दराने मिळत आहे.
मागणीपेक्षा आवक मोठ्या प्रमाणात होत असल्याने भाज्यांचे भाव उतरले आहेत. आणखीन काही दिवस हे भाव असेच राहतील. मार्च महिन्यापासून भाज्यांचे भाव वाढण्यास सुरुवात होईल. - भगवान परदेशी, भाजी विक्रेते