Join us

Reshim Market : रेशीम कोष विक्रीत बीडचा डंका; एका आठवड्यात कोट्यवधींची उलाढाल वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 14:19 IST

Reshim Market : बीड येथील रेशीम कोष खरेदी केंद्रात मागील आठवड्यात विक्रमी कोष आवक झाली आहे. तब्बल २४ टन रेशीम कोष विक्री होऊन १ कोटी ३३ लाख रुपयांची उलाढाल झाली आहे. वाचा सविस्तर (Reshim Market)

Reshim Market : बीड येथील रेशीम कोष खरेदी केंद्रात मागील आठवड्यात विक्रमी कोष आवक झाली आहे. तब्बल २४ टन रेशीम कोष विक्री होऊन १ कोटी ३३ लाख रुपयांची उलाढाल झाली आहे. (Reshim Market)

राज्यभरातील शेतकऱ्यांचा विश्वास मिळवणाऱ्या या केंद्रात शेड, त्वरित पेमेंट, पारदर्शक व्यवहार यांसारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. यामुळेच बीड हे रेशीम कोष खरेदीचं आदर्श केंद्र बनत चाललं आहे.(Reshim Market)

छत्रपती श्री शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत कार्यरत लोकनेते स्व. विनायकराव मेटे रेशीम कोष खरेदी केंद्र, बीड येथे गेल्या आठवडाभरात रेशीम कोषाची विक्रमी आवक झाली आहे. (Reshim Market)

या आवकेने कोट्यवधी रुपयांचा टप्पा पार करत बीड जिल्ह्यातील रेशीम व्यवसायाला नवसंजीवनी दिली आहे.(Reshim Market)

कोट्यवधींचा व्यवहार; शेतकऱ्यांचा विश्वास

गेल्या काही दिवसांत बीडच्या या केंद्रात मोठ्या प्रमाणावर रेशीम कोष विक्री झाली आहे.

२८ जुलै २०२५ रोजी तब्बल २४ हजार ४ किलो (२४ टन) कोषांची आवक झाली असून, याची खरेदी रक्कम १ कोटी ३३ लाख रुपये इतकी नोंदविण्यात आली.

२ ऑगस्ट २०२५ रोजी देखील १७ हजार ५२ किलो (१७ टन) कोषांची आवक झाली आहे.

या आकड्यांनी बीड येथील रेशीम कोष खरेदी केंद्राला राज्यातील अग्रगण्य केंद्रांमध्ये स्थान मिळवून दिले आहे.

शेतकऱ्यांसाठी सुविधा व भरोसा

नवीन संचालक मंडळ, सभापती मुळे, उपसभापती पडुले आणि संपूर्ण कर्मचाऱ्यांनी घेतलेले परिश्रम, तसेच पारदर्शक व्यवहारामुळे राज्यभरातील रेशीम उत्पादक शेतकरी बीडला प्राधान्य देत आहेत.

पेमेंट सिस्टिम सुधारणे, शेड उभारणी, शेतकऱ्यांना आठवडाभरात पैसे मिळण्याची हमी या सुविधांमुळे शेतकरी अधिक आत्मविश्वासाने कोष विक्रीसाठी येथे येत आहेत.

रेशीम कोष खरेदी केंद्रामध्ये शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सुविधा मिळाव्यात, त्यांचा वेळ व श्रम वाचावेत, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. यामुळेच शेतकऱ्यांचा विश्वास वाढत असून, लवकरच बीड हे रेशीम कोष खरेदीचे 'मॉडेल केंद्र' म्हणून ओळखले जाईल. - धनंजय गुंदेकर, संचालक

शासनाच्या विविध योजनांसोबत स्थानिक व्यवस्थापन आणि शेतकऱ्यांच्या सहभागामुळे बीडमधील रेशीम कोष व्यवसाय नवनवीन उच्चांक गाठत आहे. येत्या काळात आणखी मोठ्या प्रमाणावर आवक आणि आर्थिक उलाढाल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

हे ही वाचा सविस्तर : Reshim Market : 'रेशीम'ला आले सोन्याचे दिवस; क्विंटलमागे 'इतक्या' हजारांचा भाव!

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीबीड