Join us
Daily Top 2Weekly Top 5

परदेशात निर्यातीसाठी द्राक्षांच्या 5943 प्लॉटची नोंदणी, प्रति प्लॉट नोंदणीचे दर कसे? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 20:30 IST

Grape Export : शेतकऱ्यांसाठी निर्यातक्षम फळबागांची ऑनलाइन नोंदणी करणे आता अनिवार्य केले आहे.

नाशिक : शेतकऱ्यांसाठी निर्यातक्षम फळबागांची ऑनलाइन नोंदणी करणे आता अनिवार्य केले आहे. नाशिक जिल्ह्यातून द्राक्षांची परदेशात सर्वाधिक निर्यात होत असते.  नाशिकचा भाजीपाल्याला दुबई, श्रीलंकेत निर्यातीसाठी प्रोत्साहन दिले जात आहे. जिल्ह्यातून २२ डिसेंबरअखेर द्राक्षांच्या ५९४३ प्लॉटची नोंदणी ऑनलाइन झाली असून, ३८०४ हेक्टरवरील द्राक्ष युरोपात समुद्रमार्गे रवाना होतील. त्यातील ७० टक्के माल युरोपात पोहोचला आहे.

नाशिकमधून दुबईत लिंबू, हिरवी मिरची, कोथिंबिर, काकडी, गाजराची निर्यात कंटेनरद्वारे होत असून, विमानातून या देशांमध्ये हिरवा भाजीपाला निर्यात होत असल्याचे निर्यातदार संघटनेचे उपाध्यक्ष विकाससिंग यांनी सांगितले. यासाठी आधी नोंदणी अनिवार्य आहे.

कशाची नोंदणी कधीपर्यंत ?द्राक्ष प्लॉटची नोंदणी मार्चपर्यंत असते. नोंदणी १० ऑक्टोबरपासून सुरू होते. ३० डिसेंबरपर्यंत रेग्युलर फी असते. त्यासाठी ३० डिसेंबरपर्यंत ५० रुपये प्रति प्लॉट फी असून, त्यानंतर १ जानेवारीपासून ३१ मार्चपर्यंत १०० रुपये फी भरावी लागते. जिल्ह्यातून २२ डिसेंबरअखेर द्राक्षांच्या ५९४३ प्लॉटची नोंदणी ऑनलाइन झाली आहे.

परदेशासाठी नोंदणी बंधनकारकपरदेशात फळे आणि भाजीपाला निर्यात करण्यासाठी अपेडाद्वारे नोंदणी करणे बंधनकारक आहे, जी एक सरकारी नोंदणी असून याशिवाय आयएफसी (आयात-निर्यात कोड) आणि फेसाइ परवाना यांसारखे इतर परवाने व प्रमाणपत्रे आवश्यक असतात, जेणेकरून तुमचे उत्पादन आंतरराष्ट्रीय मानकांची पूर्तता करू शकेल आणि निर्यातीसाठी आवश्यक असलेल्या सर्व कायदेशीर आवश्यकता पूर्ण होतील.

ज्या शेतकऱ्यांना युरोपीय देशांत द्राक्ष, डाळिंब अथवा भाजीपाला पाठवायचा असतो, त्यासाठी नोंदणी बंधनकारक आहे. जिल्ह्यातून सर्वाधिक द्राक्षांची निर्यात होत असते. विदेशात निर्यातीपूर्वी संबंधित कृषी अधिकारी बागांची तपासणी करतात.- रवींद्र माने, जिल्हा कृषी अधीक्षक

English
हिंदी सारांश
Web Title : Nashik: 5943 Grape Plots Registered for Export; Fee Details

Web Summary : Nashik sees 5943 grape plots registered for export by December 22nd. Registration is mandatory for exporting fruits and vegetables, with fees varying from ₹50 to ₹100 based on the registration date. 70% of the 3804-hectare grape yield destined for Europe has already arrived.
टॅग्स :द्राक्षेमार्केट यार्डनाशिकशेती क्षेत्र