Join us
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्यदायी खजूर 15 टक्क्यांनी वधारले, 'या' साडेतीन इंची खजुराला 1600 रुपयांपर्यंत दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 19:35 IST

Khajur Market : ट्युनिशिया, इराण, सौदी अरेबिया आणि इराक येथून येणारे साडेतीन इंची खजूर बाजारात उपलब्ध झाले आहे. 

नाशिक : यंदा बाजारात साडेतीन इंची खजुराला मोठी मागणी आहे. आकाराने मोठा, आकर्षक व वजनदार असल्यामुळे ग्राहकांचा कल या खजुराकडे अधिक वाढला आहे. त्यामुळे त्याचा थेट परिणाम किमतींवरही दिसून येत आहे. साडेतीन इंची खजुराच्या दरात यंदा १० ते १५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.

यंदा बाजारात प्रामुख्याने अंबर आणि मक्झोल या प्रकारांतील साडेतीन इंची खजूर मोठ्या प्रमाणात दाखल झाला आहे. अंबर खजूर हा साडेतीन इंच लांबीचा असून, त्याचे सरासरी वजन २० ते २५ ग्रॅम आहे, तर मक्झोल खजूर सुमारे तीन इंचांचा असून, त्याचे वजन ३० ते ३५ ग्रॅम आहे. आकाराने मोठा आणि चवीला गोड असल्यामुळे ग्राहक मोठ्या खजुराला अधिक पसंती देत आहेत. 

सध्या जुन्या नाशकातील दूधबाजार भागातील खजूरच्या दुकानांमध्ये खरेदीसाठी गर्दी दिसून येत आहे. विशेषतः मध्यपूर्वेतील देशांमधून आयात होणाऱ्या मोठ्या आकाराच्या खजुरांना जास्त मागणी आहे. ट्युनिशिया, इराण, सौदी अरेबिया आणि इराक येथून येणारे साडेतीन इंची खजूर बाजारात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाले आहे. 

आरोग्यदृष्ट्या खजूर लाभदायकखजुराची आवक यंदा कमी झाल्यामुळे किमती वाढल्या आहेत. साडेतीन इंची खजुराचे दर १२०० ते १६०० रुपये किलोपर्यंत गेले आहेत. दिवसभर उपाशी राहिल्यानंतर शरीराला तत्काळ ऊर्जा मिळण्यासाठी खजूर उपयुक्त ठरतो. खजुरामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन व फायबर मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे आकाराने मोठा, वजनदार आणि दर्जेदार खजूर घेण्याकडे ग्राहकांचा कल वाढत आहे.

यंदा खजुराची आवक कमी झाली आहे. त्यामुळे साडेतीन इंची मोठ्या खजुराच्या दरात वाढ झाली आहे. सध्या बाजारात २० रुपयांपासून ते दोन हजार रुपये किलोपर्यंतचे खजूर उपलब्ध आहेत. यंदा बाजारात साडेतीन ते ४ इंचाच्या खजुराला मोठी मागणी आहे.- याकूब सय्यद, विक्रेते

English
हिंदी सारांश
Web Title : Healthy Dates Surge 15%: Premium Variety Reaches ₹1600 Per KG

Web Summary : High demand for larger, three-and-a-half-inch dates has increased prices by 10-15%. Popular varieties like Amber and Makzol, imported from the Middle East, are favored for their size, taste, and health benefits, reaching ₹1600 per kilogram due to reduced supply.
टॅग्स :शेती क्षेत्रमार्केट यार्डशेतकरीरमजान ईद