Join us

Onion Market : कांदा विक्रीत अडथळा; शिऊर बाजारात मोकळ्या कांद्यावर बंदी वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 12:29 IST

Onion Market : शिऊर येथील कृषी उत्पन्न उपबाजार समितीने मोकळ्या कांद्याची खरेदी थांबवत शेतकऱ्यांवर गोण्या भरलेल्या कांद्याचा आग्रह लादला आहे. परिणामी शेतकऱ्यांना प्रति ट्रॉली ८०० ते १००० रुपयांचा अनावश्यक खर्च सहन करावा लागत असून नफा नाही तर फक्त तोटाच पदरी पडतोय. इतर बाजार समित्यांमध्ये मोकळा कांदा सर्रास खरेदी होतोय, मग शिऊरमध्येच शेतकऱ्यांवर असा अन्याय का?(Onion Market)

विजय जाधव

शिऊर येथील कृषी उत्पन्न उपबाजार समितीने मोकळ्या कांद्याची खरेदी थांबवत शेतकऱ्यांवर गोण्या भरलेल्या कांद्याचा आग्रह लादला आहे. परिणामी शेतकऱ्यांना प्रति ट्रॉली ८०० ते १ हजार रुपयांचा अनावश्यक खर्च सहन करावा लागत असून नफा नाही तर फक्त तोटाच पदरी पडतोय. (Onion Market)

इतर बाजार समित्यांमध्ये मोकळा कांदा सर्रास खरेदी होतोय, मग शिऊरमध्येच शेतकऱ्यांवर असा अन्याय का? (Onion Market)

कृषी उत्पन्न उपबाजार समितीत सध्या कांदा विक्रीसाठी मोठ्या संख्येने शेतकरी येत आहेत. मात्र, व्यापाऱ्यांनी मोकळ्या कांद्याच्या खरेदीस नकार देत गोण्यांमध्ये भरलेल्या कांद्यावरच खरेदीचा आग्रह धरल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतो आहे. (Onion Market)

या निर्णयामुळे शेतकऱ्यांवर प्रति ट्रॉली ८०० ते १ हजार रुपयांपर्यंतचा अतिरिक्त खर्च पडतो असून, शेतीमाल विक्रीतून प्रत्यक्षात काहीच हाती राहत नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.(Onion Market)

गोण्यांचा खर्च शेतकऱ्यांच्या गळ्यात

शिऊर परिसरातील गारज, लोणी, मणूर, तलवाडा, खंडाळा आणि आलापुरवाडी, पेंडेफळ, निमगोंदगाव, जानेफळ, कोरडगाव, हिलालपूर खरज, चिकटगाव आदी गावांतील शेतकरी कांदा विक्रीसाठी बाजारात येत आहेत.

मात्र व्यापाऱ्यांकडून फक्त गोण्या भरलेला कांदाच घेतला जात आहे. एका ट्रॉलीमध्ये १० क्विंटल कांदा भरल्यास २० गोण्या लागतात, ज्यावर सुमारे ८०० ते १ हजार रुपये खर्च येतो.

एकरी उत्पादन खर्च व खर्चाचे गणित

खर्चाचे प्रकारअंदाजित रक्कम (रु.)
शेणखत१२,०००
रोप४०,०००
लागवड१०,०००
निंदणी१०,०००
खत४,०००
फवारणी४,०००
मजुरी२,०००
एकूण खर्च८४,३००
गोण्यांचा अतिरिक्त खर्च१,०००

बाजार समितीवर गंभीर आरोप

शेतकऱ्यांनी शिऊर बाजार उपसमितीवर शेतकरीविरोधी धोरण राबविल्याचा आरोप केला आहे. नाशिक जिल्ह्यात मोकळ्या कांद्याची सर्रास खरेदी होत असताना, शिऊरमध्ये अशा प्रकारची सक्ती का? असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. 

व्यापाऱ्यांच्या या हट्टामुळे अनेकांना बाजार समितीवर विश्वास ठेवणे कठीण झाले असून, मोकळ्या कांद्याची खरेदी त्वरित सुरू करण्याची मागणी होत आहे.

इतर बाजार समित्यांतील कांदा दर (१ ऑगस्ट २०२५)

बाजार समितीकांदा प्रकारदर (रु./क्विंटल)
शिऊरगोण्या भरलेला१,१०० – ₹१,१७५
येवलामोकळा१,१५० – ₹१,२००
अंदरसुलमोकळा१,३०० – ₹१,१५०
लासूर स्टेशनमोकळा१,२०० – ₹१,५००
बोलठाणमोकळा१,४५१ – ₹१,५७५

कांद्याचा प्रवास शिऊर ते लासूर!

शिऊरसह लोणी, तलवाडा, बोलठाण, मनूर, खंडाळा व इतर गावांत मोठ्या प्रमाणावर कांदा उत्पादन होते. शिऊर उपबाजार समितीत मोकळ्या कांद्याची खरेदी होत नसल्याने शेतकऱ्यांना तो लासूर, बोलठाण, भारम, अंदरसूल येथे नेऊन विकावा लागत आहे. शिऊर येथे मोकळा कांदा खरेदी सुरू झाल्यास शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल.- जे. के. जाधव, माजी उद्योग संचालक शिऊर

शेतकऱ्यांचा इशारा

जर शिऊर बाजार समितीत मोकळ्या कांद्याची खरेदी सुरू झाली नाही, तर आम्हाला इतर बाजारपेठा शोधाव्या लागतील. आम्ही मोकळ्या कांद्यासह शेतात येतो, व्यापाऱ्यांच्या अटींमुळे फटका आम्हालाच बसतो. हे अन्यायकारक आहे. 

हे ही वाचा सविस्तर : Tomato Market : करमाड बाजारात टोमॅटोची धूम; पावसातही दमदार आवक वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रकांदाबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समिती