- गोकुळ पवारनाशिक : दिवसरात्र कष्ट करूनही शेतमालाला भाव नाही, बाजारात नेल्यावरही व्यापारी दर ठरवतो. जे भेटलं ते पदरात पाडून घ्यायचं. अशी शेतकऱ्याची आजची अवस्था. हीच अवस्था बदलण्यासाठी रोटरी क्लब नाशिकने पुढाकार घेत शेतकऱ्यांचा हाट बाजाराची संकल्पना पुढे आणली. आणि आज जवळपास दहा वर्षांपासून हा उपक्रम सुरु असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी हाट बाजार एक महत्त्वाचे आर्थिक उत्पन्नाचे केंद्र म्हणून पुढे आले आहे.
अलीकडे आरोग्य आणि पर्यावरणाबद्दलच्या वाढत्या जागरूकतेमुळे सेंद्रिय कृषिमालाची मागणी वेगाने वाढत आहे. रासायनिक खते व कीटकनाशकांपासून मुक्त असलेल्या, नैसर्गिक पद्धतीने पिकवलेल्या सेंद्रिय उत्पादनांना अधिक मागणी आहे. याचबरोबर अनेक शेतकरी सेंद्रिय शेतमाल पिकवतात, मात्र मार्केट उपलब्ध होत नसते. या माध्यमातूनच साधारण २०१७- १८ मध्ये सामाजिक दायित्व म्हणून येथील स्थानिक शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ मिळावी, ग्राहकांना जागेवर शेतमाल मिळावा, या हेतूने हाट बाजाराची सुरवात झाली.
नाशिक जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी सेंद्रिय शेती करत आहेत. अशा शेतकऱ्यांशी संपर्क साधून हाट बाजाराची संकल्पना मांडण्यात आली. यासाठी नाशिक कृषी विज्ञान केंद्र आणि रोटरीच्या माध्यमातून शेतात भेटी देण्यात आल्या. त्यानंतर शेती ऑर्गनिक सर्टिफाईड आहे की नाही, याचीही तपासणी करण्यात आली. त्यानंतर नो लॉस नो प्रॉफिट या तत्वावर रोटरी क्लब मध्ये सुरवात झाली. त्यानंतर शंकराचार्य न्यास इथे दोन वर्ष चालविला, नंतर कोविडमुळे थांबावं लागलं. त्यानंतर बीएसएनलच्या परिसरात सुरवात झाली. आता उधोजी मराठा बोर्डिंगमध्ये चार वर्षांपासून हा बाजार सुरळीत सुरु आहे.
हाट बाजाराची संकल्पना काय आहे? दर रविवारी शेतकरी विषमुक्त भाजीपाला या बाजारात आणतात. प्रत्येक शेतकऱ्याला स्वतंत्र टेबल दिला जातो. सकाळी नऊ ते ११ या वेळेत बाजार भरतो. बाजाराच्या दिवशी आलेल्या ग्राहकांची नोंद होते. कार्ड दिले जाते, खरेदी झाल्यानंतर शेवटी पेमेंट केले जाते. या बाजाराचे वैशिष्ट्ये म्हणजे सहा महिने किंवा वर्षभराचे भाव फिक्स आहेत. ग्राहकांना, शेतकऱ्यांना परवडतील अशा पद्धतीने. तसेच ४० ते ५० ग्राहक फिक्स असून दर रविवारी १०० ते १५० ग्राहक येतात. विशेष म्हणजे एका टेबलला ४ ते ५ हजार रुपये मिळतात. अशा रीतीने ५० ते ६० हजार रुपयांचा निव्वळ नफा एका दिवसाला होत असतो. शेतकऱ्यांचे कौशल्य वाढले... दहा वर्षांपासून हा हाट बाजार भरतो आहे. या माध्यमातून इथं येणारे शेतकरी ग्राहकांशी संवाद साधतात. भाजीपाला विक्री करतात. भाज्यांबद्दल माहिती देतात. या सगळ्यातून शेतकऱ्यांचे मनोबल वाढते, मार्केटिंग, संवाद कौशल्य वाढते. शिवाय त्यांचा स्वतःचा एक संपर्क तयार होतो. तसेच नवीन शेतकऱ्यांना सहभागी व्हायचे असल्यास शेतकऱ्याचा शेतमाल तपासाला जातो, त्यानंतर सहभागी होण्यास परवानगी दिली जाते.
शेतकऱ्याला फायदा व्हावा. इथल्या ग्राहकांना दर्जेदार आणि विषमुक्त शेतमाल मिळावा, या हेतूने बाजार सुरु झाला. शेतकऱ्यांना चांगला फायदा झाला आहे. शेतकऱ्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं, ग्राहकांना चांगला भाजीपाला मिळावा, हा हेतू साध्य होत आहे. सुरवातीला पाच ते दहा शेतकरी होते, आता २० ते २५ शेतकरी येतात. यामागे जवळपास १०० ते १५० शेतकऱ्यांची मेहनत आहे.
- हेमंत राजपूत, रोटरी क्लब, व्हा. प्रेसिडेंट, नाशिक (गंजमाळ)
Web Summary : Nashik's farmer's market, initiated by Rotary Club, provides farmers with a platform to sell organic produce directly to consumers. This initiative ensures fair prices, boosts farmer skills, and offers fresh, chemical-free vegetables to customers, fostering economic empowerment and healthy eating.
Web Summary : रोटरी क्लब द्वारा शुरू किया गया नासिक का किसान हाट बाजार किसानों को सीधे उपभोक्ताओं को जैविक उत्पाद बेचने का मंच प्रदान करता है। यह पहल उचित मूल्य सुनिश्चित करती है, किसान कौशल को बढ़ाती है और ग्राहकों को ताजा, रसायन मुक्त सब्जियां प्रदान करती है, जिससे आर्थिक सशक्तिकरण और स्वस्थ भोजन को बढ़ावा मिलता है।