Join us

Nafed Kanda Kharedi : नाफेडकडून कांदा खरेदीची ट्रायल, प्रत्यक्षात कांदा खरेदी केव्हापासून?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 13:26 IST

Nafed Kanda Kharedi : एकीकडे गेल्या दोन महिन्यापासून शेतकरी कांदा खरेदीच्या (Kanda Kharedi) प्रतीक्षेत आहेत.

Nafed Kanda Kharedi : दोन महिन्यापासून खोळंबलेल्या नाफेड कांदा खरेदीला अजूनही मुहूर्त सापडलेला नाही. आज होईल, उद्या होईल या आशेवर कांदा उत्पादक शेतकरी आहेत. अशातच नाफेडकडून आजपासून कांदा खरेदीची (Kanda Kharedi Trial) ट्रायल होत असल्याचे समजते आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत प्रत्यक्षात कांदा खरेदीला सुरवात होईल, असे दिसून येते. 

एकीकडे गेल्या दोन महिन्यापासून शेतकरी कांदा खरेदीच्या (Kanda Kharedi) प्रतीक्षेत आहेत. याबाबतची निविदा काढल्यानंतर लागलीच कांदा खरेदी सुरु होईल, अशी शक्यता होती. मात्र तसे चित्र अद्यापही दिसून आले नाही. काही दिवसांपूर्वी नाफेडकडून शेतकऱ्यांना नोंदणीसाठी पोर्टल खुले करून देण्यात आले. त्यांनतर तरी कांदा खरेदीला सुरवात होईल असे वाटले होते, मात्र अजूनही ही खरेदी थंडबस्त्यात असल्याचे दिसते. 

तत्पूर्वी यंदा नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून ३ लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचे उद्दिष्टय आहे. शिवाय मागील कांदा खरेदी घोटाळ्यामुळे यंदा विविध कार्यकारी सोसायट्या मध्यस्थी असणार आहेत. आता याच पार्श्वभूमीवर कांदा खरेदीची ट्रायल घेतली जात आहे. जेणेकरून काही अडथळे आल्यास त्यात सुधारणा करून प्रत्यक्षात कांदा खरेदीला सुरवात होईल. याबाबत नाफेडकरून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.. 

ट्रायल खरेदी म्हणजे काय? यंदाच्या कांदा खरेदीसाठी नवीन खरेदीदार असणार आहेत. यासाठी ट्रायल घेण्यात येत आहे. यामध्ये काही निवडक शेतकऱ्यांना बोलवून कांदा खरेदी प्रक्रिया पार पडते. यावेळी शेतकऱ्यांची नोंदणी केली जाते, कांद्याचे वजन केले जाते, शिवाय इतर काही प्रक्रिया सोयीस्कर रित्या पार पडतात, हे तपासले जाते. जेणेकरून यात काही त्रुटी असल्यास त्या दुरुस्त केल्या जातात. जेणेकरून प्रत्यक्षात कांदा खरेदी सुरु होईल, तेव्हा व्यवस्थित रित्या पार पडेल. 

थेट कृषीमंत्री येण्याची शक्यता सध्या कांदा खरेदीची ट्रायल घेतली जात आहे. काही दिवसांत प्रत्यक्षात कांदा खरेदीला सुरवात होईल. यासाठी थेट केंद्रीय कृषी मंत्री महाराष्ट्रात येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. येत्या काही दिवसांत ही खरेदी सुरु होईल, असेही सूत्रांकडून समजते आहे. मात्र प्रत्यक्षात जेव्हा कांदा खरेदी सुरु होईल, तेव्हाच खरे काय ते समोर येईल. 

टॅग्स :कांदाशेती क्षेत्रशेतीमार्केट यार्ड