Join us

Moong Market : हमीभाव कागदापुरता; शेतकऱ्यांचा मूग अर्ध्या दरानेच विक्रीला वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 13:36 IST

Moong Market : पावसामुळे मूग उत्पादन घटले, त्यातच आता बाजारात दर मिळेनासा झाला आहे. हमीभाव जाहीर झाला असला तरी बाजारात शेतकऱ्यांच्या मूगाला अर्धेच भाव मिळत आहेत. (Moong Market)

Moong Market : पावसामुळे मूग उत्पादन घटले, त्यातच आता बाजारात दर मिळेनासा झाला आहे. हमीभाव जाहीर झाला असला तरी बाजारात शेतकऱ्यांच्या मूगाला अर्धेच भाव मिळत आहेत. (Moong Market)  

उत्पादन घटले, व्यापाऱ्यांनी दर पाडले, शेतकरी हवालदिल झाले आहेत.(Moong Market)  

खरीप हंगामातील सततच्या पावसाने मूग पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना उत्पादनात घट झालीच, त्यातच बाजारात मूगाला समाधानकारक दर न मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. (Moong Market)  

सध्या शेतकऱ्यांच्या मूगाला बाजारात फक्त ४० ते ५० रुपये प्रतिकिलो एवढाच दर मिळतोय, तर याच मुगाची दाळ किरकोळ बाजारात ९८ ते १०० रुपये प्रतिकिलो दराने विकली जात आहे.(Moong Market)  

उत्पादनावर पावसाचा फटका

खुलताबाद तालुक्यातील बाजारसावंगी, रेल, इंदापूर, बोडखा, शेखपूरवाडी, ताजनापूर, कनकशिळ, लोणी, झरी, वडगाव, येसगाव, जानेफळ या गावांमध्ये शेतकऱ्यांनी खरीप हंगामात आंतरपीक म्हणून मूग लावला होता. 

मात्र, सततच्या पावसामुळे शेंगांवर बुरशी व किडीचा प्रादुर्भाव झाला. अनेक ठिकाणी शेंगा काळपटल्या, दाणे न भरल्याने उत्पादनात मोठी घट झाली आहे.

बाजारात दुप्पट दराने विक्री

शेतकऱ्यांना मूग विकताना फक्त ४०–५० रुपये प्रतिकिलो भाव मिळतोय. पण किरकोळ बाजारात याच मुगाची दाळ तब्बल १०० रुपयांपर्यंत विकली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना कवडीमोल दर मिळताना दिसत आहेत.

हमीभाव कागदापुरता?

केंद्र सरकारने २०२५-२६ हंगामासाठी मूगाचा हमीभाव ८ हजार ६८२ रुपये प्रतिक्विंटल निश्चित केला आहे. पण प्रत्यक्ष बाजारात शेतकऱ्यांना या हमीभावाच्या निम्माही दर मिळत नाही. त्यामुळे हमीभाव फक्त कागदापुरता का? असा सवाल शेतकरी करत आहेत.

शेतकऱ्यांची व्यथा

मूग पिकाकडून खूप अपेक्षा होत्या, पण दर इतके कमी मिळत आहेत की खर्चही निघत नाही. घरखर्च कसा चालवायचा, ही मोठी चिंता आहे. सरकारने तातडीने मदतीची घोषणा करावी.- बाबुनाना जाधव, शेतकरी

सरकारकडे अपेक्षा

* मूग पिकाचे उत्पादन घटल्याने आणि व्यापाऱ्यांनी दर पाडल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. 

* हमीभाव असूनही त्याचा प्रत्यक्ष फायदा न मिळाल्याने शासनाने तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांचे संरक्षण करावे, अशी मागणी होत आहे.

हे ही वाचा सविस्तर : Halad Market : हिंगोलीत हळदीची आवक मंदावली; बाजार समितीने दिला 'हा' सल्ला वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रमूगबाजारमार्केट यार्डमार्केट यार्डपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीशेतकरी