Mirchi Market : दोन वर्षापासून परराज्यात व महाराष्ट्रातही मिरचीचा साठा मोठ्या प्रमाणात असल्याने मिरचीचे दर वाढत (Mirchi Rate Down) नसतानाच मिरचीचे भाव क्विंटल मागे १०० ते ५०० रुपयांपर्यंत घसरले आहेत. परिणामी मिरची उत्पादक व मिरची व्यापाऱ्याना लाखो रुपयांचा आर्थिक झटका बसला आहे., उत्पादक व व्यापारी यांचा डोळ्यात लाल मिरचीचे अश्रू आणल्याचे बोलले जात आहे.
तीन महिन्यापासून बाजार समितीत आवक कमी झाली मिरचीचा (Chilly Production) मोठ्या प्रमाणात साठा झाल्याने गेल्या ३ महिन्यापासून लाल मिरचीत मंदी आली आहे. तिखट बनविणाऱ्या उद्योजकांनी तिखटचे भाव स्थिर ठेवले आहेत. सद्यपरिस्थितीत तिखट २७५ ते ३५० रू किलो या प्रमाणे बाजार मिळतो आहे. राज्यासह देशातील विविध शितगृहात, बाजारपेठेत लाल मिरचीचा साठा आहे. मिरचीची निर्यात कमी झाली असून आवक पेक्षा मिरचीची (Red Chilly Arrival) मागणी घटली आहे.
नवीन हंगामाच्या तोंडावरच भाव कमी असल्याने उत्पादक शेतकरी पण चिंतेत आहे. अनेक जण रेडिमेड तिखट खरेदी करीत असले तरीही आजही बरीच ग्रामीण व शहरी भागातील कुटुंब मार्च एप्रिल महिन्यात मिरची घेऊन (मिरची पावडर) तिखट तयार करून ठेवतात. दोंडाईचा एकेकाळी मिरचीचे आगार म्हणून ओळखले जात होते. या उद्योगाला पुन्हा ते वैभव मिळावे यासाठी शासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
सरासरी दर ३ हजार ते ५ हजार रुपयांचा दरम्यान दोंडाईचा बाजार समितीत या वर्षी २८ नोव्हेंबरला पहिली आवक झाली. यावेळी जेमतेम १ क्विंटल ११ किलो होती. या वर्षी आतापर्यंत फक्त ४ हजार ६९४ क्विंटल मिरचीची आवक झाली आहे. मिरचीचे दर १२७५ ते ६५०० रुपयांपर्यंत आहेत. सरासरी दर ३ हजार ते ५ हजार रुपयांचा दरम्यान आहेत.
बदलते हवामान, अवकाळी पाऊस, बुरशी जन्य रोगांचा प्रादुर्भाव, वाढलेला उत्पादन खर्च, आश्वासक बाजारपेठ नसल्याचा परिणाम मिरची लागवडवर झालेला आहे. परिसरात मिरची उद्योगावर आधारित प्रकल्प सुरू झाला तर फायदा होईल. - भिकन पाटील, शेतकरी
आंध्र प्रदेशातील गुंटूर येथे दोन वर्षापासून मिरची उत्पादन व साठा मोठ्या प्रमाणात आहे. तसेच नजीकच्या नंदुरबारला पण आवक व साठा आहे. याचा परिणाम मिरचीस उठाव नाही. यातून अपेक्षित भाव मिळू शकत नाही. - कलीम पिंजारी, मिरची व्यापारी
आजचे मिरची बाजारभाव
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
17/01/2025 | ||||||
नागपूर | लोकल | क्विंटल | 738 | 10000 | 13000 | 12250 |
मुंबई | लोकल | क्विंटल | 174 | 14000 | 30000 | 22000 |
16/01/2025 | ||||||
अकोला | --- | क्विंटल | 8 | 12000 | 18000 | 16000 |
सोलापूर | लोकल | क्विंटल | 112 | 1800 | 15500 | 7300 |
धुळे | लोकल | क्विंटल | 122 | 2052 | 14500 | 11000 |
नागपूर | लोकल | क्विंटल | 703 | 10000 | 13000 | 12250 |
मुंबई | लोकल | क्विंटल | 695 | 14000 | 30000 | 22000 |
नंदूरबार | ओली | क्विंटल | 2024 | 1351 | 3445 | 2400 |