Join us

मेथी, कोथिंबिरीच्या जुडीला काय भाव मिळाला, जाणून घ्या भाजीपाल्याचे दर 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 8:16 PM

बाजार समित्यामध्ये मेथी आणि कोथिंबीर जुडीला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आहे.

आज राज्यातील बाजार समित्यांमध्ये सर्वच भाजीपाल्याची आवक झाली. बटाट्यापासून ते मिरचीपर्यंत, आणि मेथीपासून कोथिंबीरीपर्यंत सर्वच भाजीपाला बाजार समित्यात येत असल्याने कमी अधिक दराने विक्री होत असल्याचे चित्र आहे. पुणे, मुंबई, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर  शहरातील बाजार समित्यांमध्ये भाजीपाल्याची आवक अधिकची होत आहे. 

आज 27 मार्च रोजीच्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार आज बटाट्याला सरासरी 1300 रुपये ते 1850 रुपयांपर्यंत भाव मिळाला. सर्वाधिक 1850 रुपयांचा भाव नाशिक बाजार समितीत मिळाला आहे. भेंडीला सरासरी 1600 रुपये ते 3500 रुपये दर मिळाला. फ्लॉवरला क्विंटलमागे सरासरी 750 रुपये ते 1800रुपयांपर्यंत भाव मिळाला. नगानुसार विचार केला तर आठ ते दहा रुपये भाव मिळाला. 

तर कोथिंबिरीला क्विंटलमागे सरासरी 900 रुपयापासून ते 4000 रुपये मिळाला. कोल्हापूर बाजार समितीत सर्वाधिक दर मिळाला. तर कोथिंबीर जुडीला सरासरी सात ते आठ रुपये दर मिळाला. मेथीच्या जुडीला क्विंटलमागे सरासरी सात ते दहा रुपायपर्यंत दर मिळाला. एकट्या पुणे बाजार समितीत तब्बल 77 हजार नग कोथिंबीर जुडी आवक आवक दाखल झाली होती. या ठिकाणी जुडीमागे सात रुपये दर मिळाला. 

असे आहेत भाजीपाला दर 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

27/03/2024
कोल्हापूर---क्विंटल36150065004000
पुणे-मांजरी---नग55300386
छत्रपती संभाजीनगर---नग9600120015001350
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल67100013001150
पाटन---नग1200091110
खेड---नग800070012001000
खेड-चाकण---नग305005001200700
श्रीरामपूर---नग2150354
राहता---नग1950264
कळमेश्वरहायब्रीडक्विंटल26151020001820
रामटेकहायब्रीडक्विंटल7180020001900
अकलुजलोकलनग32005108
सोलापूरलोकलनग6393200600400
अमरावती- फळ आणि भाजीपालालोकलक्विंटल10880012001000
पुणेलोकलनग1109155107
पुणे- खडकीलोकलनग1250697
पुणे -पिंपरीलोकलनग2200698
नागपूरलोकलक्विंटल300100030002550
मुंबईलोकलक्विंटल7408001000900
चांदवडलोकलनग3808119
भुसावळलोकलक्विंटल26200030002500
मंगळवेढालोकलनग4625275
कामठीलोकलक्विंटल8200030002500

 

टॅग्स :शेतीमार्केट यार्डभाज्याकांदा