नाशिक : मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतीमालाचे डिजिटल पद्धतीने वजनमाप करणारे सॉफ्टवेअर 'बंतोष' या प्रणालीचा वापर सुरू करण्यात आला आहे. आता डिजिटल पद्धतीने शेतमालाचे व्यवहार होणार असून शेतकऱ्यांसाठी सोयीस्कर असणार आहे.
यापूर्वी राज्यातील मंचर, जुन्नर, शिरुर, राहुरी, संगमनेर, कोपरगाव, पारनेर, मालेगाव, लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी डिजिटल प्रणाली अमलात आणली आहार. त्याच आता प्रमाणेच मनमाड बाजार समितीदेखील हायटेक झाली आहे. या बाजार समितीने 'बंतोष' नावाची प्रणाली कामकाजात आणली आहे.
काय आहे 'बंतोष' प्रणाली ?
- बंतोष प्रणाली ही एक रिअल टाईम डिजिटल ऑक्शन रिपोर्टिंग सिस्टम आहे. ह्यामुळे शेतकऱ्यांना घरबसल्या शेतमालाला मिळालेला भाव समजतो.
- शेतकरी, मापाडी, खरेदीदार, व्यापारी आदींना या प्रणालीच्या माध्यमातून पावत्या बनवणे आणि त्यांचे ऑनलाइन रेकॉर्ड ठेवणे सोपे जाते.
- वेळ, पैसा, मनुष्यबळ आदींची बचत होते.
- मोबाइल अॅपद्वारे होणाऱ्या पावत्या, थर्मल प्रिंटरद्वारे हातोहात मिळणारी पावती, तसेच घरबसल्या शेतकऱ्यांना व्हॉट्सअप आणि मेसेजवर मिळणारे अपडेट्स यासाठी ही प्रणाली प्रभावी ठरत आहे.
- बंतोष या नवीन प्रणालीचे वापर केल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक फायदे मिळणार आहेत.
- त्यामुळे शेतकऱ्यांना विविध पिकांना मिळत असलेले भाव समजू शकतील आणि त्यामुळे शेतमाल विक्रीसाठी आणण्यात सोपेपणा येणार आहे.