Amba Season : सध्या आंब्याचा सीजन (mango Season) सुरु असल्याने बाजारात मोठी आवक सुरु आहे. यात केशर, हापूस, राजापुरी, तोतापुरी आदींसह इतर आंब्यांना मोठी मागणी आहे. दरम्यान या सगळ्यात नाशिकच्या ग्रामीण भागातील आंब्याची वाडीत (Ambyachi Wadi) पिकवलेल्या आंबे देखील बाजारात येऊ लागले आहे. विशेष म्हणजे थेट शेतकऱ्यांकडून घरपोच विक्रीचा पर्याय वापरला जात आहे.
नाशिक जिल्ह्यात (Nashik District) आंबा लागवड वाढली असल्याने यंदा बाजारात नाशिकचा आंबा (Nashik Mango) दिसू लागला आहे. त्यातही जिल्ह्यातील कळवण, सुरगाणा, पेठ, त्र्यंबकेश्वर आदी तालुक्यातील आंब्याची मोठी आवक होत असते. या तालुक्यातील शेतकऱ्यांनी घरगुती आंबे संगोपन बागा वाढविल्या. दरवर्षीप्रमाणे यंदाही या शेतकऱ्यांचा आंबा बाजारात येऊ लागला आहे.
दरम्यान अनेक शेतकऱ्यांनी यंदा स्वतः आंबा विक्रीची मोहीम हाती घेत घरपोच डिलिव्हरी (Mango Home Delivery) सुरु केली आहे. त्र्यंबक तालुक्यातील हरसूल येथील प्रल्हाद पवार या तरुणासह महादू गावंडे या शेतकऱ्याने यंदा हा प्रयोग राबविला आहे. प्रल्हाद पवार तरुणाची १ एकर आंबा बाग असून यावर्षी चांगला माल निघाल्याने थेट घरपोच विक्री सुरु केली आहे. पाच किलो आंब्याची पेटी ७५० रुपयांना विक्री केली जात आहे.
तर पेठ तालुक्यातील गावंधपाडा येथील महादू गावंधे या शेतकऱ्याने देखील यंदा थेट ऑनलाईन विक्रीला सुरवात केली आहे. त्यामुळे स्थानिक परिसरात नैसर्गिक रित्या पिकवलेल्या आंब्याला चांगलीच मागणी वाढत आहे. शिवाय घरपोच आंबा मिळत असल्याने या आंब्याला पसंती देत आहेत.