Join us
Daily Top 2Weekly Top 5

Mango Market : गुजरातच्या आंब्यांची धूम; बाजारात गोडवा वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 13:25 IST

Mango Market : कोकणातील प्रसिद्ध हापूस आंब्याचा हंगाम आता संपत आल्याने त्याची बाजारातील आवक कमी होत चालली आहे. मात्र, त्याचवेळी बीडच्या बाजारपेठेत गुजरातमधील विविध जातींच्या आंब्यांनी जोरदार एन्ट्री घेतली असून, बाजारात सध्या केशर, आम्रपाली, लंगडा, दशेरी आणि लालबाग आंब्यांचा गोडवा अनुभवायला मिळत आहे.(Mango Market)

अनिल भंडारी

बीड शहरातील आंबाबाजारात सध्या गुजरातच्या धरमपूर बाजारपेठेतून मोठ्या प्रमाणात केशर आंब्याची आवक होत आहे.(Mango Market)

याशिवाय कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ आणि तामिळनाडू राज्यांतूनही विविध जातींचे आंबे बाजारात दाखल होत आहेत.(Mango Market)

काही दिवसांपूर्वीपर्यंत रत्नागिरी आणि देवगडच्या हापूस आंब्याची मोठी आवक होती. मात्र आता हापूसचे प्रमाण कमी होत असून, त्याची जागा गुजरातच्या केशर आंब्याने घेतल्याचे दिसून येत आहे.

व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार, बीड बाजारात दररोज ६० ते ७० टन विविध जातींच्या आंब्यांची आवक होत आहे. गुजरात केशर आंब्याला प्रतिकिलो १५० ते १६० रुपये दर मिळत असून, स्थानिक केशर १२५ ते १५० रुपये, बंगळुरी हापूस १०० ते १५० रुपये, तर लालबाग आणि बदाम जातीचे आंबे ५० ते ७० रुपयांदरम्यान विकले जात आहेत.

स्थानिक उत्पादनावर हवामानाचा परिणाम

यंदा नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात सलग फुलोरा आल्याने स्थानिक केशर आंब्याचे उत्पादन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे अपेक्षित उत्पादन मिळाले नाही.

मात्र काही शेतकऱ्यांनी योग्य व्यवस्थापन केल्याने त्यांचा केशर आंबा बाजारात चांगल्या दराने विकला जात आहे.

नेकनूरचा 'हूर' आणि धाराशिव जिल्ह्यातील वाशी भागातील 'रत्ना' आंब्यालाही हौशी ग्राहकांकडून मागणी वाढत आहे. मात्र यंदा हूर आंब्याची आवक कमी असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

३०० जणांना रोजगार

बीड शहरात आंब्याचे सुमारे १५ ठोक व्यापारी आणि १०० हून अधिक किरकोळ विक्रेते कार्यरत आहेत. आंब्याच्या हंगामामुळे वाहतूक, विक्री, वर्गीकरण आणि पॅकिंग अशा विविध कामांतून २०० ते ३०० लोकांना रोजगार उपलब्ध होत असल्याचे चित्र आहे.

हे ही वाचा सविस्तर : Monsoon Arrival Date : मान्सूनने घेतली वेगवान धाव; महाराष्ट्रात 'या' दिवसापासून बदलणार हवामान

अधिक वाचा : Ustod Mahila Kamgar : जखमी मजुरांसाठी देवदूत ठरल्या 'आरोग्य साथी'; फडावरच सुरू झाली आरोग्य सेवा

English
हिंदी सारांश
Web Title : Gujarat Mangoes Dominate Beed Market, Sweetness Increased

Web Summary : Beed's mango market sees a surge in Gujarat Kesar mangoes, replacing Ratnagiri Hapus. Prices range from ₹50-₹160/kg. Local production is affected by weather. 200-300 people gain employment through the mango season.
टॅग्स :शेती क्षेत्रआंबाआंबाबाजारमार्केट यार्डमार्केट यार्ड