Join us

Maka Market : ऑगस्ट महिन्याच्या उर्वरित दिवसांत मक्याचे दर कसे राहतील, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 16:44 IST

Maka Market : तर आता ऑगस्ट महिन्यात उर्वरित दिवसांत दर कसे राहतील, ते पाहुयात.... 

Maka Market :  खरीप हंगाम २०२४-२५ साठी मका पिकाची किमान आधारभूत किंमत (MSP) रु. २२२५ प्रति क्विंटल इतकी जाहीर करण्यात आलेली आहे.माहे जुलै, २०२५ ची किंमत २० जुलै पर्यंतची आहे. तर आता ऑगस्ट महिन्यात उर्वरित दिवसांत दर कसे राहतील, ते पाहुयात.... 

मागील तीन वर्षातील नांदगाव बाजारातील मक्याच्या ऑगस्ट महिन्यातील सरासरी किंमती पाहिल्या तर ऑगस्ट २०२२ मध्ये रुपये २३४३ प्रति क्विंटल, ऑगस्ट २०२३ रुपये २०४५ प्रति क्विंटल, ऑगस्ट २०२४ रुपये २५६६ प्रति क्विंटल होत्या. ऑगस्ट २०२५ महिन्यासाठी मक्याचे नांदगाव बाजारातील किंमती २१०० रुपये ते २४१० रुपये प्रति क्विंटल राहण्याची शक्यता आहे. 

केंद्र शासनाच्या कृषी विभागाच्या तिसऱ्या अग्रीम अन्नधान्य उत्पादन अंदाजानुसार राज्यात सन २०२४-२५ मध्ये एकूण मक्याचे उत्पादन मागील वर्षीच्या (२०२३-२४) तुलनेत ९९.०२ टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज आहे. अमेरिकेच्या कृषी विभागाच्या अहवालानुसार मक्याची निर्यात २०२४-२५ मध्ये ६ लाख मेट्रिक टन होण्याचा अंदाज आहे. जी २०२३-२४ च्या तुलनेत २५% घट होईल असा अंदाज आहे. 

निर्यातीत घट झालीदेशांतर्गत किंमती वाढल्यामुळे आणि पिक कमी झाल्यामुळे २०२३-२४ या कालावधीत भारताची मका निर्यात चार वर्षांच्या निचांकी पातळीवर घसरली.  इथेनॉल, कुक्कुटपालन आणि स्टार्च उत्पादकांकडून वाढलेल्या मागणीमुळेही निर्यातीत घट झाली. देशात चालू वर्षीच्या जून २०२५ मध्ये मक्याची आवक मागील वर्षीच्या जून २०२४ च्या तुलेनत १.५६ टक्क्यांनी वाढली आहे.

Jamin Kharedi : तुमच्याकडे जमीन नाही पण नोंद सापडली तर जमीन नावावर होऊ शकते का? 

- मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पातील “बाजार माहिती विश्लेषण व जोखीम निवारण कक्षा अंतर्गत" शेतमालाच्या किंमतीचा अभ्यास करून ऑगस्ट २०२५ या कालावधीसाठी मका पिकाचा संभाव्य किंमतीचा सुधारित अंदाज वर्तविला आहे.

टॅग्स :मकाशेतीमार्केट यार्डशेती क्षेत्र