Join us

Maka Market : चालू सप्टेंबर 2025 मध्ये मक्याला प्रति क्विंटल काय भाव मिळतील? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 13:48 IST

Maize Market : या चालू सप्टेंबर महिन्यात मक्याचे दर कसे राहतील, हे पाहुयात..

Maka Market : केंद्र शासनाच्या कृषी विभागाच्या तिसऱ्या अग्रीम अन्नधान्य उत्पादन अंदाजानुसार राज्यात सन २०२४-२५ मध्ये एकूण मक्याचे उत्पादन मागील वर्षीच्या (२०२३-२४) तुलनेत ९९.०२ टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज आहे. 

मागील तीन वर्षातील नांदगाव बाजारातील मक्याच्या सप्टेंबर महिन्यातील सरासरी किंमती पुढील प्रमाणे. सप्टेंबर २०२२ मध्ये १९६६ रुपये प्रति क्विंटल, सप्टेंबर २०२३ मध्ये २१३१ रुपये प्रति क्विंटल, सप्टेंबर २०२४ मध्ये २३०२ रुपये प्रति क्विंटल दर मिळाले. 

खरीप हंगाम २०२४-२५ साठी मका पिकाची किमान आधारभूत किंमत (MSP) २२२५ रुपये प्रति क्विंटल इतकी जाहीर करण्यात आलेली आहे. तर यंदाच्या चालू सप्टेंबर २०२५ महिन्यासाठी मक्याचे नांदगाव बाजारात २१२० ते २४३० रुपये प्रति क्विंटल राहण्याची शक्यता आहे. 

मका उत्पादनात वाढ होण्याचा अंदाज देशात चालू वर्षीच्या जुलै २०२५ मध्ये मक्याची आवक मागील वर्षीच्या जुलै २०२४ च्या तुलेनत ३३.६७ टक्क्यांनी वाढली आहे. अमेरिकेच्या कृषी विभागाच्या अहवालानुसार सन २०२३-२४ मध्ये, भारतात मागील वर्षांच्या तुलनेत १.५ टक्के मक्याचे उत्पादनात घट होण्याच्या अंदाज आहे. तसेच सन २०२३-२४ च्या तुलनेत २०२४-२५ मध्ये मक्याचे उत्पादनात १२.२७ टक्के वाढ होण्याचा असा अंदाज आहे.

- मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पातील “बाजार माहिती विश्लेषण व जोखीम निवारण कक्षा अंतर्गत" शेतमालाच्या किंमतीचा अभ्यास करून सप्टेंबर २०२५ या कालावधीसाठी मका पिकाच्या संभाव्य किंमतीचा सुधारित अंदाज वर्तविला आहे.

 

Soyabean Market : चालू सप्टेंबर 2025 मध्ये सोयाबीनचे दर काय राहतील, वाचा सविस्तर

टॅग्स :मकामार्केट यार्डशेतीशेती क्षेत्र