Join us

Maka Market : मागील आठवड्यात मक्याची किंमत एमएसपीपेक्षा 'केवळ' इतक्या रुपयांनी अधिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 21:44 IST

Maka Market : मागील आठवड्यात मक्याला क्विंटलमागे काय भाव मिळाला, ते पाहुयात..

Maka Market : मागील आठवड्यात नांदगाव बाजारात (Nandgoan Maka Market) मक्याची किंमत २२३८ रुपये प्रति क्विंटल होती. मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात किंमतीमध्ये वाढ झाली आहे. तर मागील आठवड्याच्या तुलनेत मक्याच्या आवक मध्ये राष्ट्रीय व राज्य पातळीवर अनुक्रमे १०.२८ टक्के व २१.४५ टक्के इतकी वाढ झाली आहे.

खरीप हंगाम २०२४-२५ साठी किमान आधारभूत किंमत २२२५ रुपये प्रति क्विंटल आहे. सध्या मक्याच्या किंमती (Maize Market) MSP पेक्षा काहीशा अधिक आहेत. मागील आठवड्याच्या तुलनेत मक्याच्या आवकमध्ये राष्ट्रीय व राज्य पातळीवर अनुक्रमे १०.२८ टक्के व २१.४५ टक्के इतकी वाढ झाली आहे.

मागील आठवड्यात प्रमुख बाजारांपैकी नांदगाव बाजारात मक्याची सरासरी किंमत सर्वाधिक २२३८ रुपये प्रति क्विंटल होती, तर जालना बाजारात सर्वात कमी किंमत १८३१ रुपये प्रति क्विंटल होती.

मागील आठवड्यातील काही निवडक बाजारातील बाजारभाव पाहिले असता अमळनेर बाजारात २१४३ रुपये, धुळे बाजारात २०११ रुपये, छत्रपती संभाजी नगर बाजारात २०५१ रुपये दर मिळाला. तर आवकेचा विचार केला तर १६ फेब्रुवारीपासून ते दोन मार्चपर्यंत १००० टन इतकी आवक झाल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :मकामार्केट यार्डशेती क्षेत्रशेती