Join us

Maka Market : ऑक्टोबर-डिसेंबरदरम्यान मक्याचे दर कसे राहतील, निर्यात कशी राहील?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 12:36 IST

Maka Market : 2025 च्या शेवटी मक्याला क्विंटलमागे काय भाव मिळू शकतो, हे पाहुयात...

Maka Bajarbhav : देशात चालू वर्षीच्या में २०२५ मध्ये मक्याची आवक (Maize Market) मागील वर्षीच्या मे २०२३ च्या तुलेनत ८९.०० टक्क्यांनी वाढली आहे. केंद्र शासनाच्या कृषी विभागाच्या दुसऱ्या अग्रीम अन्नधान्य उत्पादन अंदाजानुसार राज्यात सन २०२४-२५ मध्ये एकूण मक्याचे उत्पादन (Maize Production) मागील वर्षीच्या (२०२३-२४) तुलनेत ७४.१२ टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज आहे.

जून, २०२५ ची किंमत दि. २० जून पर्यंतची आहे. मागील तीन वर्षातील नांदगाव बाजारातील मक्याच्या ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यातील सरासरी किंमती पुढील प्रमाणे आहेत. यामध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ मध्ये १९२९ रुपये प्रति क्विंटल, ऑक्टोबर ते डिसेंबर २०२३ मध्ये २०१९ रुपये प्रति क्विंटल, ऑक्टोबर ते डिसेंबर २०२४ मध्ये २०७५ रुपये प्रति क्विंटल अशा होत्या. 

खरीप हंगाम २०२५-२६ साठी मका पिकाची आधारभूत किंमत (MSP) रु. २४०० प्रति क्विंटल इतकी जाहीर करण्यात आलेली आहे. तर यंदाच्या ऑक्टोबर ते डिसेंबर २०२५ महिन्यासाठी मक्याचे नांदगाव बाजारातील अंदाजित किंमती या २००० ते २५०० रुपये प्रति क्विंटल असण्याची शक्यता आहे. म्हणजे मागील तीन वर्षांच्या किंमतीपेक्षा काहीशा अधिक असतील. 

म्हणून निर्यातीत घट झाली? अमेरिकेच्या कृषी विभागाच्या अहवालानुसार सन २०२३-२४ मध्ये, भारतात मागील वर्षांच्या तुलनेत १.५ टक्के मक्याचे उत्पादनात घट होण्याच्या अंदाज आहे. तसेच सन २०२३-२४ च्या तुलनेत २०२४-२५ मध्ये मक्याचे उत्पादनात ०.९० टक्के वाढ होण्याचा असा अंदाज आहे.

देशांतर्गत किंमती वाढल्यामुळे आणि पिक कमी झाल्यामुळे २०२३-२४ या कालावधीत भारताची मका निर्यात चार वर्षांच्या निचांकी पातळीवर घसरली. इथेनॉल, कुक्कुटपालन आणि स्टार्च उत्पादकांकडून वाढलेल्या मागणीमुळेही निर्यातीत घट झाली.

- बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पातील बाजार माहिती विश्लेषण व जोखीम निवारण कक्षाअंतर्गत शेतमालाच्या किंमतीचा अभ्यास करून ऑक्टोबर ते डिसेंबर २०२५ या कालावधीसाठी निवडक पिकांच्या संभाव्य किंमतीचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

टॅग्स :मकामार्केट यार्डशेती क्षेत्रशेती