Join us

Maka Bajarbhav : राज्यात मक्याची आवक 13 टक्क्यांनी घटली, दर एमएसपीपेक्षा अधिक, वाचा सविस्तर  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 21:19 IST

Maka Bajarbhav : मागील आठवड्याच्या तुलनेत मक्याच्या आवक मध्ये राष्ट्रीय पातळीवर ३.८० टक्के इतकी घट झाली आहे

Maka Bajarbhav : मागील आठवड्यात नांदगाव बाजारात मक्याची किंमत (Nandgoan Maka Market) २२५० रुपये प्रति क्विंटल होती. गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात किंमतीमध्ये वाढ झाली आहे. तर मागील आठवड्याच्या तुलनेत मक्याच्या आवक मध्ये राष्ट्रीय पातळीवर ३.८० टक्के इतकी घट झाली आहे व राज्य पातळीवर १३.४७ टक्के इतकी घट झाली आहे.

खरीप हंगाम २०२४-२५ साठी किमान आधारभूत किंमत २२२५ प्रति क्विंटल आहे. सध्या मक्याच्या किंमती (Maize Market) MSP पेक्षा जास्त आहेत. मागील आठवड्याच्या तुलनेत मक्याच्या आवक मध्ये राष्ट्रीय पातळीवर ३.८० टक्के इतकी घट झाली आहे व राज्य पातळीवर १३.४७ टक्के इतकी घट झाली आहे.

मागील आठवड्यात प्रमुख बाजारांपैकी अमळनेर बाजारात मक्याची सरासरी किंमत (Maize Market) सर्वाधिक २२६३ रुपये प्रति क्विंटल होती, तर जालना बाजारात सर्वात कमी किंमत २१६३ रुपये  क्विंटल होती. मागील आठवड्यात नांदगाव बाजारात मक्याला सरासरी २२५० रुपये, धुळे बाजारात २२४३ रुपये, छत्रपती संभाजी नगर बाजारात २१९६ रुपये तर जालना बाजारात २१६३ रुपये असा दर मिळाला.

आजचे मका बाजारभाव

आजचे मका बाजारभाव पाहिले तर जालना बाजारात लाल मक्याला २२७५ रुपये, अमरावती बाजारात २२२५ रुपये, पुणे बाजारात २४५० रुपये, तर लोकल मक्याला जामखेड बाजारात १६५० रुपये, अकोला बाजारात पिवळ्या मक्याला १७०० रुपये, मलकापूर बाजारात २१६० रुपये तर रावेर बाजारात ०२ हजार रुपयांचा दर मिळाला.

टॅग्स :मकाशेती क्षेत्रमार्केट यार्डशेती