Join us

मागील तीन वर्षांतील भाव अन् चालू नोव्हेंबर महिन्यात कापसाचे दर कसे राहतील, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 20:30 IST

Kapus Market : खरीप हंगाम २०२५-२६ साठी (MSP) ७ हजार ७१० प्रति क्विंटल इतकी जाहीर करण्यात आलेली आहे.

Kapus Market :    खरीप हंगाम २०२५-२६ साठी मध्यम धाग्याच्या कापूस पिकाची किमान आधारभूत किंमत (MSP) ७ हजार ७१० प्रति क्विंटल इतकी जाहीर करण्यात आलेली आहे. सद्यस्थितीत ६ हजार रुपयांपासून ते ७ हजार रुपयांपर्यंत सरासरी दर मिळतो आहे. आता नोव्हेंबर महिन्यात दर कसे राहतील, हे पाहुयात... 

मागील तीन वर्षातील अकोला बाजारातील कापसाच्या नोव्हेंबर महिन्यातील किंमतीचा आढावा घेऊया... 

  • नोव्हेंबर २०२२ रुपये ९०५० प्रति क्विंटल
  • नोव्हेंबर २०२३ रुपये ७१८३ प्रति क्विंटल
  • नोव्हेंबर २०२४ रुपये ७३२७ प्रति क्विंटल

तर नोव्हेंबर २०२५ या कालावधीसाठी कापसाच्या किमती अंदाजे ७ हजार ४० रुपये ते ७ हजार ५१० रुपये प्रति क्विंटल राहण्याची शक्यता आहे. 

केंद्र शासनाच्या कृषी विभागाच्या तिसऱ्या अग्रीम अन्नधान्य उत्पादन अंदाजानुसार राज्यात सन २०२४-२५ मध्ये एकूण कापसाचे उत्पादन मागील वर्षीच्या (२०२३-२४) तुलनेत १४.७५ टक्क्यांनी वाढ होण्याचा अंदाज आहे.

देशात चालू वर्षाच्या सप्टेंबर २०२५ मध्ये कापसाची आवक मागील वर्षीच्या सप्टेंबर २०२४ च्या तुलनेत २१.५६ टक्क्यांनी वाढली आहे. २०२४- २५ मध्ये जागतिक उत्पादन १२०२ लक्ष गाठीपर्यंत घटण्याचा अंदाज आहे. एकूणच गेल्या महिन्यात आर्थिक दृष्टिकोन सुधारला असूनही २०२४- २५ विपणन वर्षासाठी जागतिक कापसाच्या मागणीचा दृष्टिकोन काहीसा नकारात्मक आहे. 

देशात गेल्यावर्षीच्या तुलनेत २०२३- २४ मध्ये राष्ट्रीय आयात आणि निर्यातीत वाढ झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत आयात आणि निर्यातीत सरासरी ६ टक्के वाढीसह जागतिक स्तरावर हाच कल दिसून येत आहे. सरकारने ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत ११ टक्के आयात शुल्क निलंबित करण्याची घोषणा केली आहे.

- मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पातील “बाजार माहिती विश्लेषण व जोखीम निवारण कक्षा अंतर्गत" शेतमालाच्या किंमतीचा अभ्यास करून ऑक्टोबर २०२५ या कालावधीसाठी कापूस पिकाच्या संभाव्य किंमतीचा सुधारित अंदाज वर्तविला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Cotton Prices: Past Three Years & November 2025 Forecast

Web Summary : Cotton MSP is ₹7710/quintal. November prices may range ₹7040-₹7510/quintal. Production is expected to rise by 14.75% compared to last year. Import duties suspended until December 2025.
टॅग्स :कापूसमार्केट यार्डशेती क्षेत्रविदर्भशेती