Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर मार्केटमध्ये लालपेक्षा पांढऱ्या कांद्याला चांगले दर, आजचे सविस्तर कांदा बाजारभाव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 17:04 IST

Kanda Bajar Bhav : तर त्या खालोखाल पुणे, सोलापुर जिल्ह्यात अनुक्रमे १३ हजार आणि १४ हजार क्विंटल आवक झाली. 

Kanda Bajar Bhav :    १८ नोव्हेंबर रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये एक लाख १२ हजार क्विंटल कांदा आवक झाली. यामध्ये नाशिक जिल्ह्यात ५५ हजार क्विंटल तर त्या खालोखाल पुणे, सोलापुर जिल्ह्यात अनुक्रमे १३ हजार आणि १४ हजार क्विंटल आवक झाली. 

आज लासलगाव बाजारात कमीत कमी ४५१ रुपये तर सरासरी १४०० रुपये तर पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये कमीत कमी ५०० रुपये तर सरासरी १३५० रुपये, देवळा बाजारात सरासरी १२५० रुपये तर भुसावळ बाजारात सरासरी १३०० रुपये दर मिळाला.

तसेच सोलापूर बाजारात लाल कांद्याला कमीत कमी १०० रुपये तर सरासरी ९०० रुपये दर मिळाला. धुळे बाजारात सरासरी १२७० रुपये, देवळा बाजारात ९५० रुपये, पुणे बाजारात लोकल कांद्याला ११०० रुपये, सोलापूर आणि नागपूर बाजारात पांढऱ्या कांद्याला अनुक्रमे १५०० रुपये आणि १९५० रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव 

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

18/11/2025
अमरावतीलोकलक्विंटल249100020001500
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल29444001300850
धुळेलालक्विंटल268030015601270
जळगावलोकलक्विंटल120060012501000
जळगावलालक्विंटल10633001350837
जळगावउन्हाळीक्विंटल27100015001200
कोल्हापूर---क्विंटल345550020001000
नागपूरलोकलक्विंटल4202025202270
नागपूरलालक्विंटल70050015001250
नागपूरपांढराक्विंटल700180020001950
नाशिकलालक्विंटल2802501005950
नाशिकउन्हाळीक्विंटल5576431818441240
पुणे---क्विंटल276445018501250
पुणेलोकलक्विंटल1225077515501163
पुणेचिंचवडक्विंटल9985100020101500
सांगलीलोकलक्विंटल204250019001200
सातारा---क्विंटल255100018001400
साताराहायब्रीडक्विंटल12952001325800
साताराहालवाक्विंटल9950014001400
सोलापूरलालक्विंटल139471002400900
सोलापूरपांढराक्विंटल51520031001500
ठाणेनं. १क्विंटल3150017001600
ठाणेनं. २क्विंटल3130015001400
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)112224
English
हिंदी सारांश
Web Title : White Onions Fetch Better Prices Than Red in Solapur Market

Web Summary : On November 18th, markets saw 112,000 quintals of onion arrivals. White onions in Solapur and Nagpur fetched ₹1500 and ₹1950 respectively, surpassing red onion rates. Lasalgaon market saw rates up to ₹1400.
टॅग्स :कांदामार्केट यार्डशेती क्षेत्रशेती