Join us

Onion Import Duty : श्रीलंकन सरकारने कांद्यावरील आयात शुल्क कमी केले, भाव वाढणार का? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2024 14:51 IST

Onion Import Duty : आता भारतीय कांदा श्रीलंकन बाजारपेठेत जाण्यास वाव मिळाला आहे. शिवाय दरही चांगले मिळण्याची शक्यता आहे. 

Onion Import Duty :  कांदा उत्पादक  (onion Farmers) शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी असून श्रीलंकन सरकारने कांद्यावरील (Onion Import Duty) आयात शुल्क कमी केले आहे. श्रीलंकेने आयात शुल्क ३० वरून १० केल्याने निर्यातदारांनी देखील समाधान व्यक्त केले आहे. त्यामुळे आता भारतीय कांदा श्रीलंकन बाजारपेठेत जाण्यास वाव मिळाला आहे. शिवाय दरही चांगले मिळण्याची शक्यता आहे. 

श्रीलंकेने यापूर्वी कांद्याच्या आयातीवर जवळपास 30 शुल्क आकारले होते. त्यामुळे भारतीय कांदा (Indian Onion) हा श्रीलंकेत खूप कमी प्रमाणात होता. शिवाय भारतातून श्रीलंकेत केवळ 9 टक्के कांद्याची निर्यात होते. मात्र निर्यात शुल्क आकारात असल्यामुळे निर्यात मंदावली होती. अखेर श्रीलंका सरकारने याबाबत महत्त्वाचा निर्णय घेत 30 रुपये शुल्कावरून 10 रुपये केल्याने भारतीय कांद्याची आवक वाढणार आहे. 

एकीकडे महाराष्ट्रात लाल कांद्याची (Maharashtra Kanda Market) आवक वाढली असून बांगलादेशच्या निर्णयामुळे देखील निर्यातीवर सकारात्मक परिणाम झाला आहे परिणामी लाल कांद्याला चांगला भाव मिळत आहे दुसरीकडे आता श्रीलंकेने देखील आयात शुल्क कमी केल्यामुळे भारतातून निर्यात वाढण्याची शक्यता आहे श्रीलंकेतील ग्राहकांसाठी दररोज 25 ते 30 हजार कांदा बॅगची आवश्यकता भासते. ही गरज आता भारताकडून देखील भागवली जाणार आहे. सद्यस्थितीत श्रीलंकेत श्रीलंकन चलनाप्रमाणे 300 रुपये प्रति किलो कांदा दर आहेत. त्यामुळे भारतीय कांद्याला देखील चांगला दर मिळण्याची शक्यता आहे.

सलग तीन चार वर्षे कवडीमोल दरात शेतकऱ्यांनी आपला कांदा विकलेला आहे. आताही परतीच्या पावसाने कांद्याचे नुकसान झाल्यामुळे थोड्याच कालावधीसाठी कांद्याची आवक कमी आहे. म्हणून कांद्याला दर मिळत आहे. लवकरच कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. तेव्हा कांदा दर कमी होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी भारत सरकारने राहिलेले 20 टक्के निर्यात शुल्कही पूर्णपणे हटवावे. - भारत दिघोळे, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटना 

टॅग्स :कांदामार्केट यार्डशेती क्षेत्रशेती