Join us

Kanda Market : 2 ऑगस्टला लासलगाव, पिंपळगाव कांदा मार्केटला आवक किती झाली, काय भाव मिळाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 16:53 IST

Kanda Market : आज ०२ ऑगस्ट रोजी (2 August Kanda Market) राज्यातील कांदा बाजारामध्ये काय परिस्थिती होती?

Kanda Market :  आज लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याला (Unhal Kanda) कमीत कमी ६०० तर सरासरी १३३० रुपये दर मिळाला. तर पिंपळगाव बसवंत बाजारात कमीत कमी ४०० रुपये तर सरासरी १३५० रुपये दर मिळाला. याच बाजारात गोलटी कांद्याला सरासरी ८०० रुपयापर्यंत दर मिळाला. 

आज ०२ ऑगस्ट रोजी (2 August Kanda Market) राज्यातील बाजारामध्ये साडे चार वाजेपर्यंत ६४ हजार ९२४ क्विंटल कांद्याची आवक झाली. यामध्ये नाशिक जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची ४५ हजार ४३९ क्विंटल आवक झाली. जिल्हा निहाय उन्हाळ कांद्याचे दर पाहिले तर नागपूर जिल्ह्यात सरासरी १९०० रुपये, जळगाव जिल्ह्यात १००० रुपये अहिल्यानगर जिल्ह्यात ११०० रुपये दर मिळाला. 

Nafed Kanda Rate : नाफेड कांदा खरेदीचा नवा दर जाहीर, पण 'या' तारखेपर्यंतच खरेदी? वाचा सविस्तर

तसेच लाल कांद्याला (Lal Kanda Market) धुळे जिल्ह्यात सरासरी ११०० रुपये, नागपूर बाजारात १७०० रुपये, सातारा जिल्ह्यात १५०० रुपये असा दर मिळाला. दुसरीकडे लोकल कांद्याला सोलापूर बाजारात १४०० रुपये, पुणे बाजारात १०५० रुपये अमरावती जिल्ह्यात १४०० रुपये दर मिळाला. 

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

02/08/2025
अहिल्यानगरउन्हाळीक्विंटल486610017001100
अकोला---क्विंटल7250016001200
अमरावतीलोकलक्विंटल40960022001400
चंद्रपुर---क्विंटल200150020001800
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल14893001300800
धुळेलालक्विंटल26530015001100
जळगावउन्हाळीक्विंटल1180012001000
कोल्हापूर---क्विंटल500350018001000
नागपूरलालक्विंटल1242125017501700
नागपूरपांढराक्विंटल150060016001450
नागपूरउन्हाळीक्विंटल12180020001900
नाशिकउन्हाळीक्विंटल4543939614721203
पुणेलोकलक्विंटल62655015501050
सांगलीलोकलक्विंटल361950017001100
सातारालालक्विंटल50100020001500
साताराहालवाक्विंटल9950016001600
सोलापूरलोकलक्विंटल2220016001400
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)64924 
टॅग्स :कांदामार्केट यार्डशेती क्षेत्रशेती