Join us

Kanda Market : मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, गुजरात, राजस्थानात कांद्याला काय भाव मिळतोय? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 16:21 IST

Kanda Market : दुसरीकडे देशभरातील घाऊक बाजारपेठांमध्ये कांद्याचे भाव अजूनही जैसे थे आहेत. 

Kanda Market :  महाराष्ट्रातील काही निवडक बाजार समित्यांमध्ये कांदा दरात (Kanda Market Rate) सुधारणा होते आहे. मात्र दुसरीकडे देशभरातील घाऊक बाजारपेठांमध्ये कांद्याचे भाव अजूनही जैसे थे आहेत. 

आता बहुतेक बाजारपेठांमध्ये शेतकऱ्यांना प्रति किलो 10 रुपयांपेक्षा जास्त भाव मिळणे कठीण झाले आहे. आज राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि गुजरातमधील कांद्याचे ताजे भाव जाणून घ्या...

मध्य प्रदेशात कांदा भाव कसे आहेत? 

मध्य प्रदेशात कांद्याच्या (MP Kanda Market) किमती कमी आहेत. किमान किमतींव्यतिरिक्त, सरासरी किमती देखील खूप कमी आहेत. ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा खर्च वसूल करणे कठीण झाले आहे. आज देवास या बाजारात कमीत कमी 250 रुपये, तरी सरासरी 700 रुपये गौतमपुरा बाजारात कमीत कमी 230 रुपये सरासरी 800 रुपये, रतलाम बाजारात सरासरी 1133 रुपये, सेंधवा बाजारात सरासरी 1300 रुपये असा दर मिळाला. 

उत्तर प्रदेशातील कांदा मार्केट 

उत्तर प्रदेशातील बाजारपेठेतही (Uttar Pradesh Kanda Market) कांद्याचे दर वाईट असून कांद्याचे कमाल भाव 10 ते 13 रुपये प्रति किलो दरम्यान होते, जे शेतकऱ्यांना नफा मिळवून देण्यासाठी योग्य नाही. तसेच उत्तर प्रदेशातील अकबरपुर बाजारात कमीत कमी 990 तर सरासरी 1050 रुपये, हरगाव बाजारात कमीत कमी 900 रुपये तर सरासरी 950 रुपये अमरोहा बाजारात कमीत कमी 950 रुपये तर सरासरी 1000 रुपये तर जहांगीराबाद बाजारात कमीत कमी 1085 तर सरासरी 1188 रुपये दर मिळाला. 

राजस्थानातील कांदा मार्केट 

दुसरीकडे राजस्थान राज्यातील डोंगरपुर बाजारात कमीत कमी 2500 रुपये तर सरासरी 2800 बाजारात कमीत कमी 1000 रुपये तर सरासरी 1700 रुपये श्रीगंगानगर बाजारात कमीत कमी 900 रुपये तरी सरासरी 1000 रुपये आणि सुरतगड बाजारात कमीत कमी 650 रुपये आणि सरासरी 700 रुपयांचा दर मिळाला. 

गुजरात राज्यातील कांदा मार्केट 

तसेच गुजरात राज्यातील दाहोद बाजारात कमीत कमी 600 रुपये तर सरासरी 1100 रुपये जेतपूर बाजारात कमीत कमी 155 रुपये तर सरासरी 755 राजकोट बाजारात कमीत कमी 425 रुपये तर सरासरी 1175 रुपये आणि सुरत बाजारात कमीत कमी 500 रुपये तर सरासरी 1150 रुपयांचा दर मिळाला. 

टॅग्स :कांदाशेती क्षेत्रशेतीमार्केट यार्ड