Join us
Daily Top 2Weekly Top 5

Kanda Market : पारनेर, अकोले मार्केटमध्ये कांद्याला क्विंटलमागे काय भाव मिळाला, वाचा आजचे बाजारभाव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2026 20:35 IST

Kanda Market : आज ०३ मे रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची २७ हजार क्विंटल आवक झाली.

Kanda Market :  आज ०३ मे रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची २७ हजार क्विंटल आवक झाली. बाजारभाव आजही जैसे थे आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यात उन्हाळ कांद्याची १४ हजार क्विंटल अशी सर्वाधिक आवक झाली.

यामध्ये पारनेर मार्केटमध्ये उन्हाळ कांद्याला कमीत कमी २०० रुपये,  सरासरी ९७५ रुपये, अकोले मार्केटमध्ये कमीत कमी २०० रुपये, तर सरासरी १०५१ रुपये, मंगळवेढा मार्केटमध्ये लोकल कांद्याला सरासरी एक हजार रुपये वाई आणि पुणे पिंपरी मार्केटमध्ये ८५० रुपये दर मिळाला. 

छत्रपती संभाजी नगर मार्केटमध्ये कमीत कमी ३०० रुपये तर सरासरी ५५० रुपये, शिरूर कांदा मार्केटमध्ये कमीत कमी २०० रुपये सरासरी ८०० रुपये आणि सातारा मार्केटमध्ये कमीत कमी ७०० रुपये, सरासरी १ हजार रुपयांपर्यंत दर मिळाला.

English
हिंदी सारांश
Web Title : Onion Market: Parner, Akole rates and market updates for today.

Web Summary : On May 3rd, onion arrivals in Maharashtra totaled 27,000 quintals. Parner saw rates averaging ₹975/quintal, Akole ₹1051. Mangalwedha's local onion hit ₹1000. Other markets ranged from ₹550 to ₹1000.
टॅग्स :कांदामार्केट यार्डशेती क्षेत्रशेती