Join us
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याच्या वाढीव दराचे घोडे कुठे अडकले, रमजान ईदच्या दिवशी कांद्याला काय दर मिळाले? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 17:35 IST

Kanda Market : आंतरराष्ट्रीय पातळीवरील परिस्थिती या सगळ्यांमुळे कांदा दरावर परिणाम होत असल्याचे चित्र आहे.

Kanda Market : गेल्या अनेक दिवसांपासून कांदा बाजारात घसरण सुरू आहे. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. सरकारचा निर्यातीचे धोरण, तर कधी आंतरराष्ट्रीय पातळीवरील परिस्थिती या सगळ्यांमुळे कांदा दरावर परिणाम होत असल्याचे चित्र आहे. आज ईदच्या दिवशी १९ हजार ३८० क्विंटल कांदा आवक झाली. 

आज २१ मार्च रोजी लाल कांद्याला लासलगाव निफाड मार्केटमध्ये कमीत कमी ५०० रुपये, तर सरासरी ९०० रुपये, सिन्नर नायगाव मार्केटमध्ये सरासरी १ हजार रुपये, पिंपळगाव सायखेडा मार्केटमध्ये ९०० रुपये, शिरपूर मार्केटमध्ये ९५० रुपये तर भुसावळ मार्केटमध्ये ८०० रुपयांपर्यंत दर मिळाला. 

तसेच पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये उन्हाळ कांद्याला सरासरी १३०० रुपये तर पोळ कांद्याला सरासरी ८०० रुपयांपर्यंत दर मिळाला. तसेच पुणे खडकी मार्केटमध्ये लोकल कांद्याला सरासरी ८५० रुपये, पुणे पिंपरी मार्केटमध्ये १४०० रुपये, मंगळवेढा मार्केटमध्ये ५०० रुपये दर मिळाला. त्याचबरोबर बारामती जळोची मार्केटमध्ये ०१ नंबर कांद्याला १ हजार रुपये, शेवगाव मार्केटमध्ये १०५० रुपये असा दर मिळाला.

 

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

21/03/2026
अहिल्यानगर---क्विंटल4851001300800
अहिल्यानगरनं. १क्विंटल53080012001050
अहिल्यानगरनं. २क्विंटल416400700550
अहिल्यानगरनं. ३क्विंटल149100300250
धुळेलालक्विंटल2521501300950
जळगावलालक्विंटल175001000800
नाशिकलालक्विंटल28964401143933
नाशिकउन्हाळीक्विंटल430045015351300
नाशिकपोळक्विंटल89313001127800
पुणेनं. १क्विंटल69430014001000
पुणेलोकलक्विंटल63376712671017
सातारालोकलक्विंटल705001000700
सोलापूरलोकलक्विंटल7150700500
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)19380 
English
हिंदी सारांश
Web Title : Onion price drop continues; what rates on Ramadan Eid day?

Web Summary : Onion prices are falling, impacting farmers. On Eid, 19,380 quintals arrived. Red onion prices varied across markets, averaging ₹900-₹1300. Local onion in Pune reached ₹1400.
टॅग्स :कांदामार्केट यार्डशेती क्षेत्रशेती