Join us

Kanda Market : महाराष्ट्र, बिहार, गुजरात, हरियाणा राज्यात कांदा दर कसे आहेत? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 12:33 IST

Kanda Market : शेतीचा खर्च, कष्ट आणि वेळ देऊनही, कांद्याला योग्य किंमत मिळत नसल्याने शेतकरी नाराज आहेत. 

Kanda Bajar Bhav : ८ मे रोजी महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठांमध्ये कांद्याच्या किमतीत मोठी (Kanda Bajar Bhav) घसरण झाली. जिथे कांदा फक्त १०० रुपये प्रति क्विंटल दराने विकला गेला. या घसरणीमुळे कांदा उत्पादक शेतकरी अत्यंत चिंतेत आहेत. शेतीचा खर्च, कष्ट आणि वेळ देऊनही, कांद्याला योग्य किंमत मिळत नसल्याने शेतकरी नाराज आहेत. 

एकीकडे किरकोळ बाजारात कांद्याची (onion Market) किंमत २० ते २५ रुपये प्रति किलो विक्री होत आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांना बाजारात खूपच कमी किंमत मिळत आहे. देशातील महत्वाच्या बाजारपेठांमध्ये कांद्याचे भाव काय आहेत ते जाणून घेऊया.

बिहार राज्यातील कांदा बाजार ८ मे रोजी बिहारच्या बरहाट कांदा मार्केटला कांद्याची कमीत कमी किंमत १८०० रुपये नोंदवली गेली. कमाल किमतीबद्दल बोलायचे झाले तर, जयनगर कांदा मार्केटला कांद्याची कमाल किंमत २५०० रुपये नोंदली गेली. तर मुरलीगंज बाजारात कमीत कमी २ हजार रुपये तर सर्वसाधारण २१५० रुपये दर मिळाला. 

गुजरात राज्यातील कांदा बाजार ८ मे रोजी गुजरातमधील जामनगर कांदा मार्केटला कांद्याची सर्वात कमी किंमत नोंदवली गेली. येथे किमान किंमत ३२५ रुपये प्रति क्विंटल होती. त्याच वेळी, आनंद कांदा मार्केटला कमाल किंमतीच्या बाबतीत आघाडीवर होती, जिथे कमाल किंमत प्रति क्विंटल १५०० रुपये नोंदवली गेली. मात्र सर्वसाधारण किंमत ही १२५० रुपये इतकी होती. अहमदाबाद कांदा बाजारात कमीत कमी ५०० रुपये तर सर्वसाधारण ८०० रुपये दर मिळाला. 

हरियाणा राज्यातील कांदा बाजार ८ मे रोजी हरियाणा बाजारात कांद्याचा सर्वात कमी भाव बाबैन कांदा मार्केटला केवळ ६०० रुपये प्रति क्विंटल मिळाला. तर बल्लभगड कांदा बाजारात सर्वसाधारण दर १५०० रुपये प्रति क्विंटल मिळाला. अंबाला कैंट मार्केटमध्ये कमीत कमी ९०० रुपये तर सर्व साधारण ११०० रुपये दर मिळाला. 

महाराष्ट्र राज्यातील कांदा बाजार ८ मे रोजी महाराष्ट्रातील देवळा बाजार समितीत किमान किंमत १०० रुपये प्रति क्विंटल नोंदवण्यात आली. तर, चांदवड कांदा मार्केटमध्ये प्रति क्विंटल १४३० रुपये दर मिळाला. 

टॅग्स :कांदाशेती क्षेत्रमार्केट यार्डनाशिक