Join us

Kanda Bajar Bhav : राज्यात नाशिक जिल्ह्यातून कांद्याची सर्वाधिक 67 टक्के आवक, दराचं काय? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 17:39 IST

Kanda Bajar Bhav : आज नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक उन्हाळ कांद्याची (Unhal Kanda Avak) आवक झाली.

Kanda Bajar Bhav :  कांद्याची (Onion Arrival) आवक दिवसेंदिवक वाढत असून आज दिवसभरात राज्यातील बाजार समितीमध्ये 2 लाख 23 हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. आज नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक दीड लाख क्विंटल उन्हाळ कांद्याची (Unhal Kanda Avak) आवक झाली.

उन्हाळ कांद्याला (Unhal Kanda Market)  कमीत कमी 820 रुपयांपासून ते सरासरी 1200 रुपयापर्यंत दर मिळाला. तर लाल कांद्याला (Lal Kanda Market) कमीत कमी 675 रुपयांपासून ते 1000 रुपयांपर्यंत दर मिळाला. 

आज उन्हाळ कांद्याला लासलगाव  (Lasalgaon Kanda Market) बाजारात 1180 रुपये, येवला बाजारात 950 रुपये नाशिक बाजारात 820 रुपये, कळवण, मनमाड बाजारात 1100 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजारात 1150 रुपये, देवळा बाजारात 1200 रुपये दर मिळाला.

तसेच सोलापूर बाजारात लाल कांदा दरात घसरण सुरू असून आज सरासरी 700 रुपये दर मिळाला. दुसरीकडे धुळे बाजारात 1000 रुपये, नागपूर बाजारात 1100 रुपये तर पुणे बाजारात लोकल कांद्याला एक हजार रुपयांचा दर मिळाला.

वाचा आजचे बाजारभाव

जिल्हाजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

05/05/2025
अहिल्यानगरनं. १नग6709001250900
अहिल्यानगरनं. २नग540500850850
अहिल्यानगरनं. ३नग605100450450
अहिल्यानगरउन्हाळीक्विंटल19831001300700
अकोला---क्विंटल79230012001000
अमरावतीलोकलक्विंटल3895001300900
छत्रपती संभाजीनगर---क्विंटल2916350850600
धुळेलालक्विंटल43420011001000
जळगावलालक्विंटल2622377975675
कोल्हापूर---क्विंटल702750018001100
मंबई---क्विंटल1413780015001150
नागपूरलोकलक्विंटल20110015001300
नागपूरलालक्विंटल2242100016001417
नागपूरपांढराक्विंटल224060012001050
नाशिकउन्हाळीक्विंटल15319136813931034
पुणेलोकलक्विंटल101096501250950
सांगलीलोकलक्विंटल315950015001000
सातारा---क्विंटल47650014001000
साताराहालवाक्विंटल30050013001300
सोलापूरलोकलक्विंटल13010011001000
सोलापूरलालक्विंटल212061001500700
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)223373 
टॅग्स :कांदाशेती क्षेत्रमार्केट यार्डशेती