Kanda Anudan : कांदा अनुदान योजना (Kanda Anudan) सन २०२२-२०२३ मध्ये फेरछाननी अंती पात्र लाभार्थ्यांना प्रलंबित कांदा अनुदान वितरीत करण्याबाबत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील एकूण १४ हजार ६६१ शेतकऱ्यांना कांदा अनुदानापोटी (Onion Subsidy) एकूण २८ कोटी ३२ लाख ३० हजार ५०७ इतका निधी वितरीत करण्यास शासनाच्या मान्यता देण्यात येत आहे.
राज्यातील कृषी उत्पन्न बाजार (Market Yards) समित्या / खाजगी बाजार थेट पणन अनुज्ञप्तीधारक व नाफेड केंद्रांकडे दि. १ फेब्रुवारी, २०२३ ते ३१ मार्च, २०२३ या कालावधीत लाल कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ३५० रुपये जास्तीत जास्त २०० क्विंटल प्रति शेतकरी मर्यादेत अनुदान मंजुर करण्याचा शासन निर्णय दिनांक २७ मार्च, २०२३ अन्वये निर्णय घेण्यात आला आहे.
दि. १ फेब्रुवारी, २०२३ ते ३१ मार्च, २०२३ या कालावधीत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा विक्री केलेल्या परंतु सदर कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या ७/१२ उताऱ्यावरील नोंदीमुळे अपात्र केलेल्या सर्व प्रस्तावांची फेरछाननी करून पात्र ठरलेल्या एकूण १४ हजार ६६१ शेतकऱ्यांना कांदा अनुदानापोटी एकूण २८ कोटी ३२ लाख ३० हजार ५०७ इतका निधी वितरीत करण्यास शासनाच्या मान्यता देण्यात येत आहे.
इथे पहा जीआर आणि जिल्हानिहाय पात्र शेतकरी यादी
असे जिल्हा निहाय पात्र शेतकरी नाशिक जिल्ह्यातील फेरछाननी अंतर्गत पात्र लाभार्थी संख्या ०९ हजार ६४२ शेतकरी, धाराशिव जिल्ह्यातील २७२ शेतकरी, पुणे ग्रामीण मधील २७७ शेतकरी सांगली जिल्ह्यातील २२ शेतकरी, सातारा जिल्ह्यातील २००२ शेतकरी, धुळे जिल्ह्यातील ४३ शेतकरी, जळगाव जिल्ह्यातील ३८७ शेतकऱ्यांचा समावेश आहे.
तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील १३९९ शेतकरी, नागपूर जिल्ह्यातील ०२ शेतकरी, रायगड जिल्ह्यातील २६१ शेतकरी अशा पद्धतीने १४ हजार २६३ शेतकऱ्यांना हे कांदा अनुदान मिळणार आहे.