Hingoli Bajar Samiti : हिंगोली येथील संत नामदेव मार्केट यार्डात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर हळद विक्रीसाठी (Halad Sell) आणल्याने बीट प्रक्रियेवर ताण निर्माण झाला आहे. (Hingoli Bajar Samiti)
गुरुवारनंतर दाखल होणाऱ्या हळदीचे बीट आता थेट सोमवारी होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा मुक्काम वाढण्याची शक्यता असून, बाजार समितीने शेतकऱ्यांना रविवारी संध्याकाळी हळद विक्रीसाठी (Halad Sell) आणण्याचे आवाहन केले आहे. (Hingoli Bajar Samiti)
हिंगोली येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संत नामदेव मार्केट यार्डात सध्या हळदीच्या आवकेत लक्षणीय वाढ झाली आहे. मागील चार दिवसांपासून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर हळद विक्रीसाठी (Halad Sell) आणल्यामुळे बीट प्रक्रियेवर ताण आला आहे. त्यामुळे गुरुवारी दुपारी १२ नंतर आणि शुक्रवारी येणाऱ्या हळदीचे बीट आता थेट सोमवारी (९ जून) होणार असल्याचे बाजार समितीने स्पष्ट केले आहे. (Hingoli Bajar Samiti)
हळदीची वाढती आवक
४ जून सायंकाळपर्यंत आलेल्या हळदीचे बीट आणि वजनकाटा ६ जून पर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे ५ आणि ६ जून या दिवशी हळद आणल्यास तातडीने बीट होणार नाही.
७ जूनला बकरी ईद आणि ८ जूनला रविवार असल्याने बाजार बंद राहणार आहे. परिणामी, बीटसाठी वेळ लागणार असून, शेतकऱ्यांना मार्केट यार्डात मुक्काम वाढवावा लागण्याची शक्यता आहे.
बाजार समितीचा शेतकऱ्यांना सल्ला
बाजार समितीने शेतकऱ्यांना रविवार (८ जून) सायंकाळी हळद विक्रीसाठी आणण्याचे आवाहन केले आहे. यामुळे सोमवारीच बीट होऊ शकते आणि शेतकऱ्यांचा वेळ व मुक्काम वाचू शकतो.
पैशांची निकड, म्हणून शेतकऱ्यांचा ओघ वाढला
खरिपाच्या हंगामाची पेरणी जवळ येत असल्याने शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते खरेदीसाठी आर्थिक गरज भासत आहे. त्यासाठी शेतकरी हळद विक्रीसाठी मार्केट यार्डात गर्दी करत आहेत. परिणामी हळदीची आवकही वाढली आहे.
बीट नियमांचे काटेकोर पालन आवश्यक
भुसार मोंढ्यातील शेड क्र. १ मध्ये भुईमूग व तूर साठवणीसाठी अर्ध्या पट्ट्यांमध्ये वेगळे भाग निश्चित करण्यात आले आहेत.
भुईमूग शेंगा : डावीकडील अर्ध्या पट्टीत
तूर : उजवीकडील अर्ध्या पट्टीत
चुकीच्या भागात हळद, तूर किंवा भुईमूग टाकल्यास बीट प्रक्रिया केली जाणार नाही, असा इशारा बाजार समिती प्रशासनाने दिला आहे.
सध्या हळदीच्या विक्रीसाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी असून, बीट प्रक्रियेसाठी दोन दिवस सुट्टी आणि वाढीव आवकेमुळे सोमवारपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. बाजार समितीने योग्य नियोजन आणि वेळेवर माल आणण्याचे आवाहन केले असून, शेतकऱ्यांना अनावश्यक मुक्काम टाळण्याचा मार्ग मोकळा केला आहे.