Join us
Daily Top 2Weekly Top 5

मार्च 2026 मध्ये हरभऱ्याचे सरासरी दर कसे राहतील, MSP पर्यंत जातील का? वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2026 12:35 IST

Harbhara Market : सध्याच्या किंमती भारत सरकारने जाहीर केलेल्या किमान आधारभूत किंमतीपेक्षा कमी आहेत.

Harbhara Market :    रब्बी हंगाम २०२४-२५ साठी हरभऱ्याची सरकारने जाहीर केलेली किमान आधारभूत किंमत रु. ५ हजार ६५० प्रति क्विंटल इतकी आहे. सध्याच्या किंमती भारत सरकारने जाहीर केलेल्या किमान आधारभूत किंमतीपेक्षा कमी आहेत. मागील वर्ष २०२३-२४ च्या तुलनेत २०२४-२५ मध्ये आयात व निर्यात दोन्हीमध्ये वाढ झालेली आहे.

मागील तीन वर्षात लातूर बाजारपेठेतील हरभऱ्याच्या मार्चमधील सरासरी किंमती कशा होत्या, हे पाहुयात... 

  • मार्च २०२३ मध्ये ४ हजार ६९९ रुपये प्रति क्विंटल 
  • मार्च २०२४ मध्ये ५ हजार ७४२ रुपये प्रति क्विंटल
  • मार्च २०२५ मध्ये ५ हजार ८५० रुपये प्रति क्विंटल

आणि यंदाच्या मार्च २०२६ करिता संभाव्य किंमती ५ हजार रुपये ते ५ हजार ४९० रुपये प्रति क्विंटल दर मिळण्याची शक्यता आहे. 

हरभरा हे रब्बी पिक असून त्याची पेरणी ऑक्टोबर ते नोव्हेंबर व काढणी मार्च ते एप्रिल या दरम्यान केली जाते. भारत सरकारने जाहीर केलेल्या नवीन उत्पादन अंदाजानुसार सन २०२४-२५ मध्ये हरभऱ्याचे उत्पादनात सुमारे १११.१ लाख टन वाढ दिसून येते. महाराष्ट्रातील हरभऱ्याचे उत्पादन सन २०२४-२५ मध्ये २९.६ लाख टन आहे.

मार्च ते मे हा हरभऱ्याचा प्रमुख विक्री हंगाम असतो. चालू वर्षी नोव्हेंबर मध्ये हरभऱ्याची आवक कमी झालेली आहे. जानेवारी २०२६ मध्ये ती १.७७ लाख टन इतकी आहे, जी मागील महिन्यात ०.३९ लाख टन इतकी होती. भारतातील एकूण डाळ उत्पादनापैकी ४०-५० टक्के हिस्सा हरभऱ्याचा आहे. देशभरात हरभऱ्याचा वापर डाळ व वेसन या दोन्ही स्वरूपात केला जातो.

 

एका बिघ्याला 10 क्विंटल हरभरा उत्पादन, काढणीला मजुरी किती लागली, भाव काय मिळाला?

 

टॅग्स :शेती क्षेत्रमार्केट यार्डशेतीशेतकरी