जळगाव : बाजार समितीत नवीन हरभऱ्याची आवक सुरू झाली असून, गुलाबी हरभऱ्याने शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. ५ फेब्रुवारी रोजीच्या बाजारभावानुसार, गुलाबी हरभऱ्याला हमीभावापेक्षा तब्बल १ हजार ५०० रुपये जादा भाव मिळत आहे. मात्र, दुसरीकडे तुरीच्या दरात मोठी घट झाली असून चाफा हरभऱ्यालाही हमीभावापेक्षा कमी दर मिळत असल्याचे चित्र आहे.
केंद्र सरकारने हरभऱ्यासाठी ५ हजार ६५० रुपये हमीभाव जाहीर केला असला, तरी खासगी बाजारात गुलाबी हरभऱ्याला ७ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव मिळत आहे. विशेष म्हणजे, गेल्या आठवड्यात हे दर ७ हजार ५०० रुपयांपर्यंत पोहोचले होते. गुरुवारी जळगाव बाजार समितीत १६५ क्विंटल गुलाबी हरभऱ्याची आवक नोंदवण्यात आली.
बाजार समितीत चाफा हरभऱ्याची सर्वाधिक ६४४ क्विंटल आवक झाली. मात्र, याला केवळ ५ हजार २७५ रुपये भाव मिळत आहे. चाफा हरभऱ्याला खासगी बाजारात हमीभावापेक्षा ३०० ते ४०० रुपये कमी भाव मिळत आहे. चाफा, हरभरा या वाणाची जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात येते. चाफा हरभऱ्याचे दर कमी असल्याने, हरभरा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत.
तूर आणि सोयाबीनची स्थिती अशी....
- तूर : गेल्या तीन-चार दिवसांत तुरीच्या दरात ५०० रुपयांची मोठी घट झाली आहे. सध्या तुरीचे भाव ८ हजार रुपयांवर आले आहेत.
- सोयाबीन : सोयाबीनचे दर ५ हजार ५०० रुपयांवर स्थिर असून बाजारात मोठी चढ-उतार पाहायला मिळत नाही.
Web Summary : Pink chickpeas fetch ₹7,000/quintal in Jalgaon, surpassing MSP. Tur prices decline, while soybean remains stable. Farmers worry as Chafa chickpea prices dip below MSP.
Web Summary : जळगाँव में गुलाबी चने का भाव ₹7,000/क्विंटल है, जो MSP से अधिक है। तुअर की कीमतें घटीं, जबकि सोयाबीन स्थिर है। किसानों की चिंता बढ़ी क्योंकि चाफा चने की कीमतें MSP से नीचे गिर गईं।