Join us

Halad Market Update : बाजार तेजीत; हळदी उत्पादनात महाराष्ट्र अव्वल वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 17:00 IST

Halad Market Update : राज्यातील हळदी बाजारात गेल्या आठवड्याच्या तुलनेत १४% वाढ झाली आहे. वसमत बाजारात सर्वाधिक भाव नोंदवला गेला असून, महाराष्ट्र हळदी उत्पादनात देशात अव्वल स्थानी कायम आहे. वाढत्या मागणीमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. (Halad Market Update)

Halad Market Update : राज्यातील हळद बाजारपेठ पुन्हा तेजीत आली असून गेल्या आठवड्याच्या तुलनेत आवक आणि भाव दोन्ही वाढले आहेत. राष्ट्रीय पातळीवर हळदीची आवक १३.९३ टक्क्यांनी, तर महाराष्ट्रात १४.०८ टक्क्यांनी वाढल्याचे अधिकृत आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. या वाढीमुळे शेतकरी व व्यापाऱ्यांमध्ये आशावाद निर्माण झाला आहे.(Halad Market Update)

वसमत बाजारात सर्वाधिक भाव

राज्यातील प्रमुख बाजारपेठांमध्ये वसमत बाजार समितीने सर्वाधिक भाव मिळवला असून, तेथे हळदीचा सरासरी दर ११ हजार ६५१ प्रति क्विंटल इतका नोंदवला गेला आहे. तर लोणार बाजारात सर्वात कमी म्हणजे १० हजार ५०० रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. गेल्या आठवड्यात हिंगोली बाजारात १० हजार ७७९ रुपये इतका सरासरी दर होता, जो यंदा आणखी वाढला आहे.

जागतिक पातळीवर मागणीत वाढ

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही हळदीची मागणी झपाट्याने वाढत आहे. २०२४ ते २०३१ या कालावधीत हळदीचा जागतिक बाजार सतत वाढीचा दर (CAGR) दाखवेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. आयुर्वेदिक औषधे, मसाल्यांचा वाढता वापर आणि नैसर्गिक उत्पादनांच्या मागणीमुळे भारतीय हळदीचे जागतिक स्थान अधिक मजबूत होईल, अशी अपेक्षा आहे.

शेतकरी आणि व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया

शेतकऱ्यांनी वाढलेल्या भावाचे स्वागत केले आहे. हळदीच्या दरवाढीमुळे आमचा खर्च निघून थोडाफार नफा होईल, मात्र भाव स्थिर राहणेही आवश्यक आहे, असे हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सांगितले.

व्यापाऱ्यांचे मत आहे की, दरात सातत्य टिकवण्यासाठी बाजारपेठ स्थिर राहणे महत्त्वाचे आहे.

उत्पादनात महाराष्ट्र अव्वल

हळदीच्या उत्पादनात महाराष्ट्र राज्य देशात आघाडीवर आहे. सन २०२३-२४ मध्ये लागवडीखालील क्षेत्र आणि उत्पादन या दोन्ही बाबतीत महाराष्ट्राने पहिला क्रमांक मिळवला आहे. 

सांगली, हिंगोली, नांदेड, परभणी आणि वाशिम हे जिल्हे हळदीच्या उत्पादनासाठी विशेष प्रसिद्ध आहेत. येथील हळद देशभरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये पोहोचते आणि उच्च दर्जासाठी ओळखली जाते.

राज्यातील हळदी बाजारपेठेत आवक आणि भावात झालेली वाढ शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण ठरत आहे. दरवाढीचे हे संकेत आगामी हंगामात स्थिर बाजारपेठेचे सूचक ठरू शकतात.

हे ही वाचा सविस्तर :  Cotton Cultivation : कापूस लागवडीचे गणित बिघडले; बोंडे, रोगराई आणि महागाईचा फटका

English
हिंदी सारांश
Web Title : Turmeric Market Surges; Maharashtra Leads Production, Farmers Benefit

Web Summary : Maharashtra's turmeric market is booming, with prices up 14%. Wasmat sees highest rates. Increased demand boosts farmers as Maharashtra leads turmeric production nationally. Global demand also rises.
टॅग्स :शेती क्षेत्रमहाराष्ट्रबाजारपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमार्केट यार्डमार्केट यार्ड