Join us

Halad Market : मागील आठवड्यात हळदीच्या किंमतीत 'इतक्या' रुपयांची घट, वाचा सविस्तर  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 21:58 IST

Halad Market : मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात हळदीच्या किंमतीमध्ये (Turmeric Market) घट झाली आहे.

Halad Market :  मागील आठवड्यात हिंगोली बाजारात हळदीची किंमत (Halad Market) ११ हजार १०५ रुपये प्रति क्विंटल होती. मागील आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात किंमतीमध्ये घट झाली आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत हळदीच्या आवकमध्ये राष्ट्रीय पातळीवर २१.२९ टक्के इतकी घट झाली आहे व राज्य पातळीवर १.३५ टक्के इतकी वाढ झाली आहे.

मागील आठवड्यात प्रमुख बाजारांपैकी सांगली बाजारात हळदीची (Sangali Halad Market) सरासरी किंमत सर्वाधिक १७ हजार ९८३ रुपये क्विंटल होती, तर हिंगोली बाजारात सर्वात कमी किंमत ११ हजार १०५ रुपये क्विंटल होती. मागील आठवड्यात नांदेड बाजारात हळदीला क्विंटल मागे ११ हजार ८०८ रुपये, वसमत बाजारात ११ हजार ४५७ रुपये, तर रिसोड बाजारात ११ हजार ४५७ रुपये दर मिळाला. 

दुसरीकडे हळदीची आवक वाढली असून १६ फेब्रुवारी रोजी ४००० टन इतकी तर त्यानंतर पंधरा दिवसांनी म्हणजेच ०२ मार्च रोजी सहा हजार टनावर येऊन ठेपली आहे. २०२४ ते २०३१ या अंदाज कालावधीत जागतिक हळदीची बाजारपेठ लक्षणीय दराने वाढण्याची अपेक्षा आहे. 

सन २०२३-२४ मध्ये हळदीचे लागवडीखालील क्षेत्र आणि उत्पादन यामध्ये महाराष्ट्र राज्य भारतामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात सांगली, हिंगोली, नांदेड, परभणी, वाशीम हे हळदीची लागवड करणारे प्रमुख जिल्हे आहेत.

स्रोत : हळद आउटलुक अहवाल

टॅग्स :शेती क्षेत्रकृषी योजनाशेतीसांगली