Join us

Halad Market : रिसोडमध्ये हळदीची मोठी आवक; मुंबईत दर उच्चांकी वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 17:15 IST

Halad Market : राज्यातील बाजार समितीमध्ये आता हळदीची आवक मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. जाणून घ्या सविस्तर (Halad Market)

Halad Market :  पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी मागील हंगामातील हळद विक्रीस आणली असून बाजार समित्यांत मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. गुरुवारी (३ जुलै) रिसोड बाजारात तब्बल ४२०० क्विंटल हळदीची विक्रमी आवक झाली. (Halad Market)

मुंबईत हळदीचे दर तब्बल २५ हजार रुपये क्विंटलवर पोहोचले असून शेतकऱ्यांना समाधानकारक दर मिळत आहेत, त्यामुळे बाजारात उत्साहाचे वातावरण आहे. यावेळी कांडी हळदीला किमान ११ हजार ३०० रुपये ते कमाल १२ हजार ७०५ रुपये प्रति क्विंटल, तर गडू हळदीला किमान १० हजार ५०० रुपये ते कमाल ११ हजार ६०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाले. (Halad Market)

मागील काही दिवसांपासून दर स्थिर असून, शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर विक्री करण्यास सुरुवात केली आहे.(Halad Market)

३ जुलै रोजी रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्वाधिक आवक ४ हजार २०० क्विंटल झाली.(Halad Market)

अन्य बाजार समित्यांतही मोठी आवक झाली

हिंगोली : २,०५० क्विंटल

नांदेड : १,४२२ क्विंटल

पुर्णा : ५१ क्विंटल

कसा दर मिळाला?

कांडी हळद (रिसोड) 

किमान दर – ११ हजार ३०० रु. क्विंटल

कमाल दर – १२ हजार ७०५ रु. क्विंटल

गडू हळद (रिसोड) 

किमान दर – १० हजार ५०० रु. क्विंटल

कमाल दर – ११ हजार ६०० रु. क्विंटल

अन्य ठिकाणचे दर 

नांदेड : ९ हजार ५०० – १२ हजार ६२०

हिंगोली : १० हजार ५०० – १२ हजार ५००

पुर्णा (राजापुरी) : १० हजार ७५० – ११ हजार ९००

मुंबईत हळदीचे दर सर्वाधिक होते : १९ हजार – २५ हजार रु. क्विंटल

कोणत्या बाजारात मागणी जास्त?

* रिसोड बाजार समितीत मागणी जास्त होती कारण येथेच सर्वाधिक ४,२०० क्विंटल आवक झाली.

* त्यानंतर हिंगोलीतही मागणी चांगली दिसली २ हजार ५० ते २ हजार १२० क्विंटल आवक आणि १२ हजार ५०० रुपये कमाल दर मिळाला.

* मुंबईत हळदीचे दर सर्वाधिक मिळाले २५ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत, त्यामुळे मुंबईत चांगल्या प्रतीच्या हळदीसाठी मोठी मागणी आहे.

हे ही वाचा सविस्तर : Halad Market : हळदीच्या दरात निराशा! 'पिवळं सोनं' विक्रीऐवजी घरातच ठेवण्याची वेळ वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीबाजारमार्केट यार्डमार्केट यार्ड