Join us

Halad Bajarbhav: हळदीला 'सुवर्ण' दर; 'या' बाजारात मिळतोय विक्रम भाव वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 15:43 IST

Halad Bajarbhav : मागील काही दिवसांपासून हळद बाजारात शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नसल्याने निराशा झाली होती. परंतु, लोणार कृषी उत्पन्न बाजार समितीत (APMC) हळदीच्या दराने विक्रमी उसळी घेतल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले आहे. वाचा सविस्तर (Halad Bajarbhav)

Halad Bajarbhav :  मागील काही दिवसांपासून हळद बाजारात शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नसल्याने निराशा झाली होती. परंतु, लोणार कृषी उत्पन्न बाजार समितीत (APMC) हळदीच्या दराने विक्रमी उसळी घेतल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले आहे. (Halad Bajarbhav)

तब्बल १३ हजार ४०० रुपये प्रतिक्विंटल दराने हळद विक्री झाल्याने मेहनतीला मोबदला मिळाल्याची भावना शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. दरवाढीमुळे परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आपली हळद विक्रीसाठी बाजार समितीकडे आणण्यास सुरूवात केली असून, बाजार परिसरात पोत्यांचे ढीग रचलेले पाहायला मिळत आहेत. (Halad Bajarbhav)

हळदीला मिळाला विक्रमी दर

लोणार बाजार समितीत हळदीला १३ हजार ४०० रुपये क्विंटलचा उच्चांक मिळाला आहे. हळदीच्या दरात मोठी उसळी घेतल्याने लोणार कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

हळदीला तब्बल १३ हजार ४०० रुपये प्रतिक्विंटलचा विक्रमी दर मिळाल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे मेहनतीचे चीज झाले आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने आपली हळद विक्रीसाठी बाजार समितीकडे आणत असून, बाजार परिसरात हळदीच्या पोत्यांचे ढीग रचलेले दिसत आहेत.

दरवाढीमुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास उंचावला

पारदर्शक व्यवस्थापन आणि शेतकरीहिताच्या निर्णयामुळे बाजार समितीत विक्रीसाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. याचाच परिणाम म्हणून मागील २० दिवसांत सुमारे ६ हजार ५०० क्विंटल हळदीची आवक झाली आहे. व्यापाऱ्यांमध्ये वाढलेल्या स्पर्धेमुळे शेतकऱ्यांना अधिक चांगला दर मिळत असल्याचे प्रत्यक्ष अनुभवास येत आहे.

या यशस्वी दरवाढीमागचे कारण सांगताना बाजार समितीचे सभापती प्रा. बळीराम मापारी यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवर चांगला दर मिळावा, यासाठी बाजार समितीतच हळद आणि भुईमूग खरेदीस सुरुवात केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना इतरत्र माल नेण्याची गरज नाही. व्यापाऱ्यांमध्ये स्पर्धा वाढून दर सुधारले आहेत. शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा.

वाशिम जिल्ह्यातही दरवाढ

फक्त लोणारच नव्हे, तर रिसोड येथील बाजार समितीतही हळदीच्या दरात वाढ झाली आहे. १९ मे रोजी झालेल्या लिलावात कांडी हळदीला किमान १२ हजार ४५० ते कमाल १३ हजार ६५० रुपये दर मिळाला. गट्टू हळदीला देखील ११ हजार ८०० ते १२ हजार ५५० रुपये दर मिळाला आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत या दरात ८०० रुपयांपेक्षा अधिक वाढ झाली आहे.

* २० दिवसांत ६ हजार ५०० क्विंटल हळदीची विक्री

* पारदर्शक विक्रीमुळे शेतकऱ्यांचा प्रतिसाद

* रिसोड बाजार समितीमध्येही दरवाढ कमाल १३ हजार ६५० रुपयांचा विक्रमी दर

 * लोणार बाजार समितीत १३ हजार ४०० रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला.

हे ही वाचा सविस्तर : Tur Market Update : तुरीच्या बाजारात पडझड; जाणून घ्या काय आहे कारण सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीबाजारपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमार्केट यार्डमार्केट यार्डबाजार समिती वाशिम