Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > जीएसटीमुळे किराणा यादीतील बदाम, सुकामेवा, खजूर, तूप काय भाव मिळेल? 

जीएसटीमुळे किराणा यादीतील बदाम, सुकामेवा, खजूर, तूप काय भाव मिळेल? 

Latest news GST On Sukameva see price of almonds, dry fruits, dates, ghee in grocery list due to GST | जीएसटीमुळे किराणा यादीतील बदाम, सुकामेवा, खजूर, तूप काय भाव मिळेल? 

जीएसटीमुळे किराणा यादीतील बदाम, सुकामेवा, खजूर, तूप काय भाव मिळेल? 

GST On Grocery : आता सात टक्के जीएसटी कमी लागणार असल्याने खरेदीतून ग्राहकांची दरमहा ५०० ते ७०० रुपयांची बचत होणार आहे. 

GST On Grocery : आता सात टक्के जीएसटी कमी लागणार असल्याने खरेदीतून ग्राहकांची दरमहा ५०० ते ७०० रुपयांची बचत होणार आहे. 

नाशिक : महिन्याच्या किराणा यादीतील सुकामेवा, वॉशिंग पावडर, साबण, शाम्पू, बेबी डायपर, टूथपेस्ट, रेहार आणि आफ्टर-शेव्ह लोशन, गावरानी (शुद्ध) तूप यासारख्या उत्पादनांवर आता सात टक्के जीएसटी कमी लागणार असल्याने खरेदीतून ग्राहकांची दरमहा ५०० ते ७०० रुपयांची बचत होणार आहे. 

थंडीची चाहूल लागली असून या दिवसात सुकामेव्याला मागणी दुपटीने वाढते. अशा काळातच या वस्तुंवरील जीएसटी थेट ७ टक्के होणार असल्याने ग्राहकांना घसघशीत लाभ मिळेल. सहा हजाराच्या किराणा यादीतून ६०० ते ७०० रुपयांची बचत सहज होणार असल्याचे किराणा व्यावसायिकांनी सांगितले. 

किराणा व्यावसायिकांनी मालावरील बेसिक रेट वाढविले तर ग्राहकांना या लाभाचा फारसा फायदा होणार नाही. चहा पावडर, साखर, शेंगदाणा, तेल आदी वस्तूवरील जीएसटी पूर्वीसारखाच असेल. त्यामुळे या वस्तूंचे दर 'जैसे थे' राहतील.

वस्तूचेआताचे आणि नवीन दर (प्रति किलो) 
तूप आताची किंमत ८०० रुपये तर नवीन किंमत ७०० रुपये, बदाम आताची किंमत ८५० रुपये तर नवीन किंमत ७७० रुपये, अंजीर आताची किंमत १९०० रुपये तर नवीन किंमत १७२० रुपये, खजूर आताची किंमत ३५० रुपये तर नवीन किंमत ३०५ रुपये, सिरम ७५ ग्रॅम आताची किंमत ४५ रुपये तर नवीन किंमत ४० रुपये, केचप ८५० ग्रॅम आताची किंमत १०० रुपये तर नवीन किंमत ९३ रुपये, जॅम २०० ग्राम आताची किंमत ९० रुपये तर नवीन किंमत ८० रुपये अशा पद्धतीने किमती असणार आहेत.

Web Title : जीएसटी प्रभाव: बादाम, सूखे मेवे, घी जैसे किराने के सामान पर मूल्य कटौती

Web Summary : जीएसटी कटौती से राहत! अपनी मासिक किराने की बिल में सूखे मेवे, घी और अन्य पर बचत की उम्मीद करें। कीमतों में 5 रुपये से 100 रुपये प्रति आइटम तक की कटौती हुई है। चाय, चीनी की कीमतें अपरिवर्तित हैं।

Web Title : GST Impact: Price Drop on Groceries Like Almonds, Dry Fruits, Ghee

Web Summary : GST reduction brings relief! Expect savings on dry fruits, ghee, and more in your monthly grocery bill. Price cuts range from ₹5 to ₹100 per item. Tea, sugar prices remain unchanged.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.