Join us

Onion Market : रामटेक बाजार समितीत उन्हाळ कांद्याला चांगला भाव, असे आहेत आजचे दर 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2024 7:11 PM

आज रविवार असल्याने राज्यभरात कांद्याची आवक केवळ 45 हजार क्विंटल झाल्याचे दिसून आले.

आज रविवार असल्याने काही निवडक बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक झाली. आज जवळपास 43 हजार 830 क्विंटल कांद्याची आवक झाली. यात सर्वाधिक लोकल कांद्याला आवक झाली. अहमदनगर बाजार समितीत उन्हाळ कांद्याची 14067 क्विंटल आवक झाली. आज कांद्याला सरासरी 900 रुपयापासून ते 1500 रुपये दर मिळाला. 

आज 07 एप्रिल 2024 रोजी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार राज्यातील पुणे बाजार समितीत लोकल कांद्याची सर्वाधिक 19 हजार 126 क्विंटल आवक झाली. जुन्नर -आळेफाटा बाजार समितीत चिंचवड कांद्याची 7 हजार 376 क्विंटल आवक झाली. तर पारनेर बाजार समितीत उन्हाळ कांद्याची 14067  क्विंटल आवक झाली.

पुण्यात लोकल कांद्याला सरासरी 1100 रुपये दर मिळाला. जुन्नर -आळेफाटा बाजार समितीत चिंचवड कांद्याला सरासरी 1500 रुपये दर मिळाला. पैठण बाजार समितीत उन्हाळ कांद्याला सरासरी 1000 रुपये, पारनेर बाजार समितीत 1300 रुपये आणि रामटेक बाजार समितीत 1500 रुपये दर मिळाला. दुसरीकडे नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये लिलाव बंद आहेत. तर आजही लाल कांद्याची आवक दिसून आली नाही. 

असे आहे आजचे कांदा बाजारभाव 

बाजार समितीजात/प्रतपरिमाणआवक

कमीत कमी

दर

जास्तीत जास्त

दर

सर्वसाधारण

दर

07/04/2024
सातारा---क्विंटल656100016001300
राहता---क्विंटल118320018001400
जुन्नर -आळेफाटाचिंचवडक्विंटल7376100018101500
पुणेलोकलक्विंटल1912660016001100
पुणे- खडकीलोकलक्विंटल14100017001350
पुणे -पिंपरीलोकलक्विंटल27100015001250
पुणे-मोशीलोकलक्विंटल6454001400900
मंगळवेढालोकलक्विंटल1080016001300
पैठणउन्हाळीक्विंटल70230016001000
पारनेरउन्हाळीक्विंटल1406730017001300
रामटेकउन्हाळीक्विंटल24140016001500
 
टॅग्स :शेतीमार्केट यार्डकांदारामटेकनाशिक