Gahu Market : आज रविवार 11 मे रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची (Wheat Market) 324 क्विंटलचे आवक झाली. तर गव्हाला क्विंटल मागे (Gahu Rate Per Quintal) कमीत कमी 2524 रुपये तर सर्वसाधारण 2650 रुपयांपर्यंत दर मिळाला. तर अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, लातूर आणि पुणे बाजारात गव्हाची आवक झाली.
गव्हाचे जिल्हानिहाय बाजार भाव पाहिले तर अहिल्यानगर (Ahilyanagar Gahu Market) जिल्ह्यात 21 89 गव्हाला कमीत कमी 24 ते 25 रुपये तर सर्वसाधारण 2650 रुपये दर मिळाला. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात बन्सी गावाला कमीत कमी 2425 रुपये तर सरासरी 2660 रुपये दर मिळाला.
लातूर बाजारात (Latur Wheat Market) 2189 गव्हाला कमीत कमी 2501 रुपये तर सरासरी 2524 रुपये दर मिळाला. दुसरीकडे पुणे बाजारात 2189 गव्हाला कमीत कमी 2450 रुपये तर सरासरी 2700 रुपये दर मिळाला आणि छत्रपती संभाजीनगर बाजारात अर्जुन गव्हाला कमीत कमी 2450 रुपये तर सरासरी 2500 रुपये दर मिळाला.
वाचा आजचे बाजारभाव
बाजार समिती | जात/प्रत | परिमाण | आवक | कमीत कमी दर | जास्तीत जास्त दर | सर्वसाधारण दर |
---|---|---|---|---|---|---|
11/05/2025 | ||||||
शेवगाव | २१८९ | क्विंटल | 26 | 2425 | 2650 | 2650 |
दौंड | २१८९ | क्विंटल | 133 | 2450 | 2900 | 2700 |
औसा | २१८९ | क्विंटल | 42 | 2501 | 2801 | 2524 |
सिल्लोड | अर्जुन | क्विंटल | 53 | 2450 | 2550 | 2500 |
पैठण | बन्सी | क्विंटल | 70 | 2425 | 2800 | 2660 |